कोरोना योद्ध्यांना पुणेकरांचा सलाम; थाळीनाद-शंखनादाने दुमदुमला परिसर!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

खडकी बाजार परिसरात काही नागरिकांनी 'भारतमाता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा दिल्या.

Coronavirus : पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यूचे आवाहन सर्व भारतीयांना केले होते. त्यामुळे सकाळी ७ वाजलेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत जवळपास सर्व नागरिकांनी घरात बसून या आवाहनाचे पालन केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, दिवसभर कोरोना विषाणूचा धोका पत्करत डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस, माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि इतर अनेकजण यांनी आपली सेवा बजावली. टाळ्या आणि थाळी वाजवून त्यांचे आभार मानण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. त्या आवाहनाला पुणेकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. 

Image may contain: 1 person, sitting

- Coronavirus: महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा; मध्यरात्रीपासून अंमलबजावणी

धायरी, वडगांव, नऱ्हे, धनकवडी, नऱ्हे, बालेवाडी, चांदनी चौक, एनडीए, तळेगाव, कोंढवे धावडे, कर्वेनगर, म्हाळुंगे, खडकवासला, औंध, वडगाव बुद्रुक, उत्तमनगर येथील सर्व रहिवाशांनी आपल्या सोसायटीच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या, थाळ्या, शंख, विविध प्रकारचे सायरन आणि फटाके वाजवून उस्फुर्त प्रतिसाद दिला. यामध्ये घरातील सर्वजण सहभागी झाले होते. यामध्ये बच्चेकंपनी आघाडीवर होती. 

Image may contain: outdoor

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतला मोठा निर्णय!

खडकी बाजार परिसरात काही नागरिकांनी 'भारतमाता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा दिल्या. तसेच टाळ्यांचा कडकडाट, शंखनाद आणि घंटानाद केला. खडकीकरांनी शंभर टक्के खडकी बंद ठेवत जनता कर्फ्यू यशस्वी केला.

- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमकीत 17 जवान हुतात्मा

Image may contain: 5 people, people standing


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune citizens clap to Thank those fighting at Forefront Against Coronavirus