Lockdown : समाजसेवेचा डांगोरा पिटणारे नगरसेवक गेले 'आऊट ऑफ कव्हरेज'!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

कोरोना व्हायरस संसर्गाची भीती सर्वांनाच आहे. मात्र, सुरक्षित अंतर ठेवत आणि दक्षता घेत नागरिकांना आधार देणे गरजेचे आहे.

कॅन्टोन्मेंट : प्रभागात औषध फवारणी करण्यासाठी नगरसेवकांना फोन केला, तर उचलत नाहीत, काहींचा फोन स्वीच ऑफ लागत आहे. शहरामध्ये सर्वत्र औषध फवारणी केली जात आहे. मात्र, उपनगरातील अनेक भागांमध्ये कोणी फिरकले नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी पदयात्रा, रॅली काढून समाजसेवेचा डांगोरा पिटणारे स्वयंघोषित नेते कुठे गायब झाले, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगभर लॉकडाऊन जारी केले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि महापौर जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेत नेतृत्व करणारे नगरसेवक 'आऊट ऑफ कव्हरेज' गेले असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

- Fight with Corona : इटलीनं खरंच 'सरेंडर' केलं आहे काय?

नगरसेवकांनी ज्या प्रभागामधून आपण निवडून आलो आहोत, तेथील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना दिलासा दिला पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा नागरिकांची आहे. किराणा, भाजीपाला, दूध अशा वस्तू रास्त भावात मिळतात का, काही अडचणी आहेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये व्यवस्था केली आहे. मात्र, त्याची शहानिशा कोणी करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रभागामध्ये निर्जंतुकीकरण औषध फवारणी करणे गरजेचे आहे. देशभरात पुढील 18-20 दिवस संचारबंदी आहे.

- सलाम तुमच्या कार्याला; संकटात मदत करावी टाटा समूहासारखी!

नागरिकांना आधार द्यावा

नगरसेवकांनी प्रशासन-नागरिकांचा दुवा बनून शासकीय मदतीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना मिळवून दिला पाहिजे. कोरोना व्हायरस संसर्गाची भीती सर्वांनाच आहे. मात्र, सुरक्षित अंतर ठेवत आणि दक्षता घेत नागरिकांना आधार देणे गरजेचे आहे.

- Fight with Corona : इटली जगाला दाखवतंय आशेचा किरण!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Citizens complaints about corporators switch off their mobiles in lockdown situation