
Pune : टेकडी वाचवा ट्रेक अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
समाधान काटे
शिवाजीनगर - गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील वेताळ टेकडीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. टेकडीवर रस्ता बनवल्या जात असल्याने विविध स्तरातून या प्रकल्पाचा विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रविण डोंगरे यांनी रविवार (ता.२८) वेताळ टेकडी ट्रेकचे आयोजन केले होते.
टेकडीवरील मारूती मंदिर येथे या ट्रेकची समाप्ती झाली. टेकडीचे महत्त्व समजण्यासाठी आणि पर्यावरण जनजागृती करिता या ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे,राम थरकुडे,व सूर्यकांत पवार,आकाश रेणुसे,अभिजीत धाड़ावे,निखिल ओरसे, युवराज पारेख उपस्थित होते.यासह वेताळ टेकडी कृती बचाव समितीचे तसेच पर्यावरण प्रेमी सारंग यादवाडकर, डॉ.सुमिता काळे, प्रदीप घुमरे, ॲड. असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व पर्यावरणप्रेमींच्या हातात सेव्ह वेताळ टेकडी असे फलकही दिसून आले.