पुणे : भाजपची महत्त्वपूर्ण बैठक; महापौरपदाच्या नावावर होणार चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

- पुणे महापालिकेचा नवा महापौर ठरविण्यासाठी भाजपच्या शहर कोअर कमिटीची बैठक पुढील तासाभरात होईल.

पुणे : पुणे महापालिकेचा नवा महापौर ठरविण्यासाठी भाजपच्या शहर कोअर कमिटीची बैठक पुढील तासाभरात होईल. या बैठकीत तिघा इच्छुकांच्या नावांबाबत चर्चा होईल आणि ती राज्याकडे पाठवण्यात येणार आहेत.  

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महापौरपद खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित आहे. या पदावर विराजमान होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षानेच हुलकावणी दिल्याने काहीजण या पतीसाठी फिल्डिंग लावून आहे. राज्यातील सत्तेच्या नव्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासू आणि अनुभवी नगसेवकाला या पदावर संधी मिळेल, असे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे.

येत्या 22 नोव्हेंबरला नव्या महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

मुंबईकरांनो तुम्हाला मिळतंय शुद्ध पाणी; राजधानी तळालाच

महापालिकेत भाजपची सत्ता असून, या पक्षाकडे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदासह सर्व पदाधिकारी भाजपचेच आहेत. मुक्ता टिळक यांची महापौरपदाची मुदत संपत आल्याने त्यासाठी बुधवारी आरक्षण सोडत झाली. त्यामध्ये हे पद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने पुण्याचा नवा महापौर कोण? याची चर्चा रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune City BJP Leaders Meeting soon will Discussion on mayor post