Crime on Criminals : पुणे शहरातील साडेतीन हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांवर कारवाई

पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ९ गुन्हेगारी टोळ्यांमधील ६५ सराईत गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
Crime News
Crime News esakal
Summary

पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ९ गुन्हेगारी टोळ्यांमधील ६५ सराईत गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

पुणे - शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ९ गुन्हेगारी टोळ्यांमधील ६५ सराईत गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तसेच, तीन गुन्हेगारांना ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत स्थानबध्द केले असून, ४२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीराविरुध्द आणि मालमत्तेविरुध्द गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांनी गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सर्व पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.त्यानुसार कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगार तपासणी, गुन्हेगार आदान-प्रदान अशा योजना राबवून गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईबाबत आयुक्त रितेश कुमार यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यात तीन हजार ७०० सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार ९ गुन्हेगारी टोळ्यांमधील ६५ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा औषधी द्रव्यविषयक हातभट्टीवाले तसेच धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (एमपीडीए) अंतर्गत तीन गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. दोन गुन्हेगारांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात तर, अन्य एका गुन्हेगारास नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. तसेच, रेकॉर्डवरील ४२ गुन्हेगारांना पुणे शहर, जिल्हा आणि पुणे पिंपरी-चिंचवडमधून तडीपार करण्यात आले आहे.

यापुढेही शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com