पाण्याची चिंता मिटली...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पुणे - यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने जोर धरला. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे महिनाभराच्या कालावधीत खडकवासला धरण साखळीसह जिल्ह्यातील धरणेही तुडुंब भरली आहेत. परिणामी, शहराच्या पिण्याच्या पाण्यासह जिल्ह्यातील सिंचनाचाही प्रश्‍न सुटला आहे.

पावसाचा जोर ओसरल्याने मंगळवारी धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला.  बहुतांश धरणांमधील पाणीसाठा ६ जुलैला शून्यावरच होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचे पुनरागमन झाले. त्यानंतर महिनाभरात झालेल्या दमदार पावसामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच बहुतांशी धरणे पूर्ण भरली आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune city drinking problem has been solved