पुणे शहरात जवळपास दीडपट अधिक पर्जन्यमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune rain water

पुणे शहरात यंदाच्या मोसमात सरासरीच्या जवळपास दीडपट अधिक पावसाची नोंद झाली आहे.

पुणे शहरात जवळपास दीडपट अधिक पर्जन्यमान

पुणे - शहरात यंदाच्या मोसमात सरासरीच्या जवळपास दीडपट अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी पडणाऱ्या सर्वसामान्य पर्जन्यमानापेक्षा शुक्रवार पर्यंत तब्बल २११.५ मिलीमीटर अधिक पाऊस पडला.

जून महिन्यात केवळ हजेरी लावून संपूर्ण महिना सुट्टी घेणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या सात तारखेपासूनच पुण्यासह राज्यभरात जोरदार बॅटींगला सुरवात केली. तेंव्हापासून सुरू झालेला पाऊस गणेश विसर्जनानंतरही कायम आहे. जुलै महिन्यात कर पावसाने १० वर्षांचे 'रेकॉर्ड' मोडीत काढले होते. तीन वर्षांपूर्वी २०१९मध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक ३७७ मिमी पावसाची नोंद शहरात झाली होती.

यंदाच्या पावसाने जुलै अखेर पर्यंत ३७७.६ मिमीचा टप्पा गाठला होता. गणेशोत्सवातही शहरात पावसाची संततधार चालू होती, तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंदही झाली. मॉन्सून दाखल झाल्यापासून शहरात शुक्रवार (ता.१६) पर्यंत दरवर्षी सर्वसामान्यमपणे ५२३ मिमी पर्जन्यमान होते. यंदा मात्र तब्बल ७३४.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे सरासरी १४० टक्के पाऊस पडला आहे. तब्बल ४० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस यंदा पडला आहे. जिल्ह्यातही ४० टक्के अधिक पाऊस पडला आहे.

Web Title: Pune City More Rainfall Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punerainwater