महिलांच्या सुरक्षिततेसाठी "बडीकॉप' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

पुणे - नोकरदार महिलांना विशेषतः आयटी आणि इतर कंपन्यांमध्ये कार्यरत महिलांना सुरक्षिततेबाबत कोणतीही अडचण आल्यास शहर पोलिस त्यांच्या मदतीला तातडीने धावून येणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी "बडीकॉप' हा ग्रुप सुरू केला असून, 40 महिलांच्या मागे एक यानुसार पोलिस कर्मचारी "बडीकॉप' म्हणून नेमण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिली. 

शहरात आयटी कंपन्यांमधील अंतरा दास आणि रसिला राजू या दोन अभियंता तरुणींचा खून झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. या घटनांमुळे महिलांच्या 

सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील कार्यक्रमात "वॉक विथ सीपी' ही संकल्पना नुकतीच राबविण्यात आली. त्याचाच 

एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त "बडीकॉप' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांच्या मनात पोलिसांबाबत विश्‍वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. महिलांना आपण संकटात आहोत, असे वाटल्यास त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनी नमूद केले. पोलिस सहआयुक्‍त सुनील रामानंद, पोलिस उपायुक्‍त दीपक साकोरे, सहायक आयुक्‍त सुरेश भोसले, अरुण वालतुरे, पोलिस निरीक्षक राधिका फडके, सायबरतज्ज्ञ पंकज घोडे या वेळी उपस्थित होते. 

काय आहे "बडीकॉप' ग्रुप 
- एका "बडीकॉप' (पोलिसमित्र) ग्रुपमध्ये 40 ते 50 महिलांचा समावेश 
- प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान 20 "बडीकॉप' ग्रुप 
- शहरात एक हजार "बडीकॉप' ग्रुप स्थापन करणार 
- एका "बडीकॉप' ग्रुपमागे महिला अथवा पुरुष पोलिस कर्मचारी 
- मोबाईल, व्हॉट्‌सऍप आणि ई-मेलद्वारे संपर्क 
- महिलांनी नावनोंदणी करणे आवश्‍यक 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना 
- महिलांसाठी "प्रतिसाद' ऍपही उपलब्ध 
- पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रारीसाठी "माय कम्प्लेंट'ची सुविधा 
- हेल्पलाइन क्रमांक ः 1091 

लोकेशनवर आधारित एसओएस मोबाईल ऍप 
- महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा देण्याचा प्रयत्न 
- आठवडाभरात कार्यान्वित करणार 
- महिलांना ऍप डाउनलोड करावे लागणार 
- ऍपवरील बटन क्‍लिक केल्यास महिलेचे लोकेशन कळेल. जवळच्या पोलिस ठाण्यातील फोनची घंटी वाजेल 
- पोलिस कर्मचाऱ्याने फोन न घेतल्यास त्या ठाण्याच्या पोलिस निरीक्षकास फोन जाईल. 
- पोलिस निरीक्षकाने फोन न उचलल्यास त्याच्या वरिष्ठांना फोन जाईल. त्यामुळे गरजू महिलेस तातडीने मदत मिळेल 

Web Title: Pune city police visited women