Pune Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने एकही मृत्यू नाही

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या स्थितीबाबतचा अहवाल रोज रात्री प्रसिद्ध केला जातो
pune corona update
pune corona updatesakal media

पुणे : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.२१) कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. शहरात दुसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू सुरू झाल्यापासून आजपर्यंतची सलग दोन दिवस एकही मृत्यू न होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. पुण्याबरोबरच नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातही दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यू नोंद झालेली नाही. जिल्ह्यात दिवसभरात ३४८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील अवघे ७९ रुग्ण आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या स्थितीबाबतचा अहवाल रोज रात्री प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून हे उघड झाले आहे. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभरात केवळ दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

दिवसभरात जिल्ह्यातील ३७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुण्यातील ८३ जण आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये शहरातील ७९ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ६६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८०, नगरपालिका हद्दीतील २० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन रुग्णांचा समावेश आहे.

एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील ८३ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवड ८९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र १६७, नगरपालिका हद्दीतील ३० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दोन रुग्ण आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील विविध रुग्णांलयात १ हजार ९४४ रुग्णांवर उपचार सुरु असून उर्वरित २ हजार १२६ जण गृह विलगीकरणात आहेत.

पुण्यातील सक्रिय रुग्ण हजाराच्या आत

दरम्यान, पुणे शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी (ता.२१) एक हजारांच्या आत आली आहे. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ५०८ रुग्णांवर विवध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उर्वरित ४७६ जण गृह विलगीकरणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com