पुणे शहरातील वाहतूक परिस्थिती काय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

पुणेकरांनो....वाहतूक कोंडीपासून सुटका हवी असेल तर जरा वाहतूक कोंडीचा आढावा घेवून मगच बाहेर पडा.

पुणे : वाहतूक कोंडीपासून सुटण्यासाठी पुणेकरांचा नेहमी प्रयत्न सुरु असतो. या वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी कधी गल्ली बोळातून रस्ता काढतील तर कधी कोंडीत अडकू नये म्हणून घरीच बसून राहतील. पुणेकरांनो....वाहतूक कोंडीपासून सुटका हवी असेल तर जरा वाहतूक कोंडीचा आढावा घेवून मगच बाहेर पडा.

ट्रॅफिकचे लाईव्ह अपडेट #TrafficUpdates :

ठिकाण : शिवाजीनगर येथील कृषीमहाविद्यालय समोरील उड्डाणपूल ते पुणे सेंट्रल माॅल चौक.
वेळ : संध्याकाळी नऊ वाजल्यापासून वाहतूक कोंडीचे कारण: शिवाजीनगर ते  विद्यापीठ रस्ता मार्गे पाषाण, औंध व पिंपरी चिंचवड, बाणेर व पुढे महामार्गाकडे जाणारी वाहने ही मनपा , हडपसर,पुणे स्टेशनकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकत्र येतात. सर्व वाहने  एकाचवेळी  आल्याने व रस्त्यावरील मोठ्या वाहनांची गर्दी यामुळे कोंडी होते.याच वेळेत खाजगी व एसटी महामंडळ बसेसची  मुंबईकडे जाणारी संख्या जास्त असते यामुळेही वाहतुक मंदावते याचा परिणाम या भागात कोंडी होत आहे.

#TrafficUpdates :

अंदाजे किती वेळाने कोंडी सुटेल : अंदाजे रात्री दहा नंतर
पर्यायी रस्ता असल्यास:*सिमला ऑफीस ते पुणे सेंट्रल माॅलपर्यंत पर्यायी रस्ता नाही.

सूचना : वाहतुक नियमांचे पालन करणे.

फोटो स्थळ : पुणे सेंट्रल माॅल सिग्नल ते कृषी महाविद्यालय उड्डाणपूल 

ट्रॅफिकचे लाईव्ह अपडेट : शिवणे

ठिकाण : शिवणे नवभारत हायस्कुल ते शिंदेंपुल
वेळ: संध्याकाळी 6 पासून वाहतूक वेग कमी झाला

वाहतूक कोंडीचे कारण : शिंदे पूल चौक रस्तारुंदीकरण व काँक्रीटकरण काम सुरू, अतिक्रमण काढली पाहिजेत, रस्त्यात येणारी झाडे, विजेचे खांब काढले पाहिजेत

अंदाजे किती वेळाने कोंडी सुटेल : 9:00 नंतर

पर्यायी रस्ता : नाही
आज एक अधिकारी व पाच कर्मचारी वाहतूक सुरळीत करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune City Traffic Update