शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

महापालिकेच्या जलकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. १३) शहरातील बहुतांश भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी ता. १४) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल.

पुणे - महापालिकेच्या जलकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. १३) शहरातील बहुतांश भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी ता. १४) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल.

दरम्यान, वडगाव जलकेंद्रात येणाऱ्या भागांतील पाणीपुरवठा जाहीर झाल्याप्रमाणे आठवड्यातून एक दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तेथे नव्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुरू राहील. पर्वती जलकेंद्र (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग), लष्कर जलकेंद्र, चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर या जलकेंद्रातील महत्त्वाची कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यामुळे या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहील. त्यामुळे या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune city water supply will be closed today