Pune
PuneSakal

Pune : पुणे जिल्हयात स्वच्छ जल से सुरक्षा अभियान राबविण्यात येणार

पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

निरगुडसर : जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वच्छ, शुध्द व शाश्वत पिण्याचे पाणी नागरिकांना नियमित पुरवठा व्हावे या हेतूने ता.1 डिसेंबर ते ता.31 डिसेंबर 2022 या कालावधीत पुणे जिल्हयात स्वच्छ जल से सुरक्षा अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

स्वच्छ जल से सुरक्षा अभियानांतर्गत हर घर जल या मोबाईल ॲपव्दारे नळ पाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जीओ टॅगिंग करणे, पाणी गुणवत्ता परीक्षण करणे,

एफ टी के व्दारे तपासणी व त्यासाठीचे प्रशिक्षण, गावात पाणी गुणवत्ता विषयक कामांसाठी निवड केलेल्या 5 महिलां व्दारे पाणी तपासणी, मान्सून पश्चात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी गुणवत्ता परिक्षण करणे, मान्सून पश्चात विहित कालावधीत सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्याकरीता पाणी नमुने गोळा करण्याचे कामे या अभियानात केली जाणार आहेत.

या मोहीम कालावधीत पाणी नमुना प्रयोगशाळा तपासणीत रासायनिक/जैविक घटकांसाठी दूषित आढळलेल्या पाणी स्त्रोतांवर उपचारात्मक उपाययोजना करुन त्याची नोंद केंद्राच्या संकेत स्थळावर करण्यात येणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com