Pune : कोणी गैरवर्तन करत असल्यास मुलींनी सहन करू नये ; गार्गी काळे पाटील

माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आपल्या समस्या मनमोकळेपणाने आईला व शिक्षिकांना सांगाव्यात.
माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी
माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी sakal

मंचर : माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आपल्या समस्या मनमोकळेपणाने आईला व शिक्षिकांना सांगाव्यात. जर कोणी गैरवर्तन करत असेल तर ते सहन करू नका. त्यासाठी बाल कल्याण समिती व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था सदैव तुमच्या मदतीसाठी सोबत आहे.” असे ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या मुख्य अधिकारी गार्गी विशाल काळे पाटील यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रमात काळे बोलत होत्या. यावेळी उपमुख्यध्यापिका सुरेखा भांगरे, डॉ. चैत्राली मोरे, शिल्पा खुडे, अँड बाळासाहेब पोखरकर, सुहास खेडकर उपस्थित होते.

माता पालक यांच्यामध्ये प्रश्न मंजुषा कार्यक्रम झाला. नीलम बाणखेले, वर्षा भोर, वंदना साळवे, वृषाली काळे, मंगल बाणखेले, प्रियांका बाणखेले या विजेत्यांना झुआरी ऍग्रो केमिकलचे कंपनीचे अधिकारी अनिल चिंचोलकर, किरण पवार व पुणे जिल्हा कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या हस्ते महिलांचा सन्मान व बक्षीसे देण्यात आली.

नामदेव थोरात व नरेंद्र घुले यांच्यावतीने शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप यावेळी केले. मुख्याध्यपिका सलमा शेख यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मनिषा सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी
Pune News : आज्जीसाठी चोरट्याला भिडणारी नात Exclusive मुलाखत

“व्यवसाय, साहित्यविश्व, प्रशासकीय सेवा, परराष्ट्र सेवा, पोलीस खाते, हवाई सेवा, क्रीडांगण सर्वत्र महिलांनी यशाची पताका फडकवली आहे. उत्तमरित्या कुटुंब चालवतात.जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होईल.”

सलमा शेख, मुख्याध्यापिका महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल मंचर.

माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी
Hingoli : औंढ्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात घोषणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com