Pune News : गुरूवारपासून पुण्यात एशिया इकोनॉमिक परिषद | pune conference Asia Emerging World Order Corona epidemic inaugural Senior Scientist PIC Dr. Raghunath Mashelkar PIC External Affairs Minister S. Jaishankar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Global Conference in Pune

Pune News: गुरूवारपासून पुण्यात एशिया इकोनॉमिक आंतरराष्ट्रीय परिषद

Pune News - एशिया इकोनॉमिक डायलॉग (एईडी) २०२३ ही भू-अर्थशास्त्र परिषद गुरूवार (ता.२३) ते शनिवार (ता.२५) पुण्यात पार पडत आहे.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयच्या वतीने आयोजित परीषदेचे उद्घाटन परराष्ट्र मंत्री डॉ. एस.जयशंकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कोरोना साथीनंतर जगावर परिणाम करणाऱ्या भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परीषदेची संकल्पना ‘एशिया अ‍ॅन्ड द इर्मजिंग वर्ल्ड ऑर्डर’ ही आहे.

गुरूवारी उद्घाटन सत्रात ज्येष्ठ शास्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थितांचे स्वागत करतील. तर यावेळी भूतानचे अर्थमंत्री लिओंपो नामगे शेरीन आणि मालदिवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर सहभागी होणार आहे,

अशी माहिती परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. गौतम बंबावाले यांनी दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला पीआयसीचे अध्यक्ष डॉ. माशेलकर, उपाध्यक्ष विजय केळकर उपस्थित होते.

तीन दिवसीय परिषदेत परिषदेत मंत्री, धोरणकर्ते, औद्योगिक नेतृत्व, विविध क्षेत्रातील तज्ञ जागतिक व्यापार आणि अर्थतज्ञ यांचा सहभाग असतो.

परिषदेची सांगता शनिवारी (ता.२५) होत असून, केंद्रिय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयुष गोयल यांचे या सत्रात प्रमुख भाषण होईल.

या सत्राच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर असतील. विशेष निमंत्रितांसाठी हॉटेल जे.डब्ल्यू मॅरिएट येथे ही परिषद पार पडेल.

परिषदेचे आकर्षण

  • ब्राझील, अमेरिका, तैवान, ब्रिटन, साऊथ आफ्रिका, भुतान, मालदिव, सिंगापूर आणि मेक्सिकोसह १२ देशांमधील ४४ वक्ते सहभागी होणार आहेत.

  • जी २० चे अध्यक्षपदासाठी भारताचा दृष्टीकोन आणि ग्लोबल साऊथ ही संकल्पना जी२० कार्यक्रमाला कसा आकार देईल ही दोन महत्त्वाची सत्रे आहेत. या सत्रात गोखले राज्यशास्र व अर्थशास्र संस्थेचे डॉ.अजित रानडे हे भारताचे प्रमुख जी२० समन्वयक हर्षवर्धन श्रींगला यांच्याशी संवाद साधतील.

  • यावेळी मुंबईतील ब्राझीलचे कौन्सुल जनरल जो डे मेंडाँको लिमा नेटो आणि मुंबईतील दक्षिण आफ्रिकेचे कॉन्सुल जनरल अँड्रिया क्युन हे चर्चासत्रात सहभागी होतील.

  • इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायणमूर्ती यांच्याशी ‘टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड टॅलेंट फॉर ग्लोबल सक्सेस’ या विषयावर फायर साईड चॅट संवाद. पीआयसीचे विश्वस्त डॉ.गणेश नटराजन हे त्यांच्याशी संवाद साधतील.