पुणे : 'भारत बचाव आंदोलना'साठी शहर काँग्रेस पदाधिकारी दिल्लीला रवाना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

- शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह इतर स्थानिक नेतेमंडळीही दिल्लीला. 

पुणे : केंद्र सरकारच्या संविधान विरोधी निर्णयांना विरोध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने दिल्ली रामलीला मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत बचाव रॅलीसाठी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते आज दिल्लीला रवाना झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जनहिताचा कोणताही निर्णय न घेता भय भूक बेरोजगारी उद्यापासून जनतेचे लक्ष भरकट होण्यासाठी केंद्रात सत्तेत असलेले भाजप सरकार धर्मवादाची राजकारण करून मूळ प्रश्नांना बगल देत आहेत.

 नागरिकत्व सुधारणा कायद्याला दोन राज्यांचा विरोध

पाशवी बहुमताच्या आधारे घटनेविरोधी निर्णय घेऊन भारताचे सार्वभौमत्व संपवण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असल्याने त्याचा निषेध नोंदवण्यासाठी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उद्याच्या दिल्ली येथील आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे मत रमेश बागवे यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Congress leaders going to Delhi for Bharat Bachav Andolan