esakal | पुण्यातील रेमडेसिव्हिर नियंत्रण कक्षातील हेल्पलाइन ठरली ‘हेल्पलेस’ 

बोलून बातमी शोधा

remdesivir.

पुण्यात रेमडिसिव्हरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

पुण्यातील रेमडेसिव्हिर नियंत्रण कक्षातील हेल्पलाइन ठरली ‘हेल्पलेस’ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : ‘रेमडेसिव्हीर औषधासाठी डिलरला फोन केला की ते म्हणतात, अन्न व औषध प्रशासनाने सांगितल्याशिवाय ते देता येणार नाही. त्यानंतर नियंत्रण कक्षात फोन केला...सकाळी मॅडम होत्या. त्यांनी दुपारपर्यंत उपलब्ध करून देऊ असे सांगितले. परंतु दुपारी त्यांची ड्यूटी बदलली. दुसऱ्या कर्मचाऱ्याने डिलरकडे माल नसेल, तर देणार कोठून? असे म्हणत फोन ठेवून दिला. रुग्णांना रेमडेसिव्हीरची गरज आहे. अशा परिस्थितीत एफडीएने डीलरला फोन करून रुग्णालयांना औषध देण्यास सांगावे. तसे होत नसल्यास रुग्णांना प्रिस्क्रिप्शन द्यावे लागेल, मग हे नियंत्रण कक्ष कशासाठी सुरू केले,’ असा संतप्त सवाल रुग्णालयांनी केला. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्यात रेमडिसिव्हरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु रुग्णालये आणि रुग्णांच्या नातेवाइकांकडून सतत फोन सुरू झाल्यामुळे कक्षातील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर गेली. कक्षातील दूरध्वनी क्रमांक आणि टोल फ्री क्रमांक दिवसभर व्यस्तच होते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्हा प्रशासनाकडून रुग्णालयांना आणि रुग्णांच्या नातेवाइकांना वेळेवर मदत मिळावी, नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. २४ तास कार्यरत असलेल्या कक्षात प्रत्यक्ष अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे दिवसभर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. 
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जिल्हा नियंत्रण कक्ष 

  • दूरध्वनी ०२०-२६१२३३७१ 
  • टोल फ्री क्रमांक १०७७ 

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​
जिल्ह्यासाठी सहा हजार रेमडेसिव्हीर, भरारी पथकांची नेमणूक 
पुणे जिल्ह्यासाठी सोमवारी सहा हजार रेमडेसिव्हीर इंजक्शन प्राप्त झाले आहेत. कंपनीच्या डेपो आणि स्टॉकिस्टमार्फत कोविड रुग्णालयांना हा पुरवठा केला जाणार आहे. सोमवारी रात्रीपर्यंत संबंधित रुग्णालयांना साठा पोच करण्यात येईल. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसारच आवश्यक रुग्णांसाठीच रेमडेसिव्हीरचा वापर करावा. याबाबत घाऊक विक्रेते आणि रुग्णालयांची पडताळणी करण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.