कोविड रुग्णाचा मृत्यू; हॉस्पिटलच्या काचा फोडल्या; स्टाफलाही शिवीगाळ

कोविड रुग्णाचा मृत्यू; हॉस्पिटलच्या काचा फोडल्या; स्टाफलाही शिवीगाळ

वाघोली : रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने अतिदक्षता विभागातील कोविड रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. मात्र या दरम्यान एका गंभीर रुग्णाच्या महिला नातेवाईकाने डॉक्टर व स्टाफला शिविगाळ करीत रुग्णालयाची काच फोडली. अखेर पोलीस बंदोबस्तात रुग्णांना स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान त्या गंभीर रुगणाचा मृत्यू झाला. ही घटना वाघोलीतीळ उबाळे नगर मधील मोरया हॉस्पिटल मध्ये घडली.

कोविड रुग्णाचा मृत्यू; हॉस्पिटलच्या काचा फोडल्या; स्टाफलाही शिवीगाळ
पुण्यात हजारो बांधकाम मजूर सरकारी सुविधांपासून वंचित

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गालगत वाघोली-उबाळेनगर येथे असणाऱ्या मोरया हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा साठा रविवारी रात्री कमी पडू लागला होता. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कल्पना देऊन अतिदक्षता विभागातील रुग्णांचे इतर रुग्णालयात स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनानेच रुग्णांच्या स्थलांतराची सोय करण्यास मदत केली. स्थलांतरादरम्यान एका गंभीर रुग्णाच्या महिला नातेवाईकांने विरोध दर्शविला व हॉस्पिटलची काच फोडून स्टाफला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात व्हेंटिलेटर वरील एक व अतिदक्षता विभागातील ७ रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले. स्थलांतर करत असताना अतिधसका घेतल्याने हरिदास साहरुख (रा. मांजरी, वय ३२) या गंभीर रुग्णाचा मृत्यू झाला.

सध्या या रुग्णालयात ३० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. मृत साहरुख या रुग्णांची प्रकृती गंभीर असतानाच रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्याची प्रकृती न सुधारल्याने त्याला अन्य मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला हॉस्पिटलने दिला होता. मात्र नातेवाईकांनी हलविले नाही. तो अतिगंभीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने पूर्ण प्रयत्न केले. असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. रुग्णाच्या एका महिला नातेवाईकाने हा प्रकार केला. मात्र याबाबत कोणतीच फिर्याद दाखल नसल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com