esakal | बारामती नगरपालिकेत येण्यास नागरिकांना निर्बंध; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम

बोलून बातमी शोधा

Baramati muncipal council

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिका आवारात व कार्यालयामध्ये नागरिकांना येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

बारामती नगरपालिकेत येण्यास नागरिकांना निर्बंध; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम
sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिका आवारात व कार्यालयामध्ये नागरिकांना येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. नगरपरिषद कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2021 पर्यंत खालील प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या आहेत अशी माहिती मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली. कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी वगळून इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय नगरपरिषद कार्यालयात प्रवेश करण्यास परवानगी असणार नाही. ज्या अभ्यागतांना बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे त्यांच्या बाबतीत विभाग प्रमुख यांचेमार्फत प्रवेशपत्र दिले जाईल. नागरिकांनी नगरपरिषदेकडील जन्म-मृत्यू दाखले व इतर परवानगी प्रमाणपत्र तयार झाल्याचे संबंधित विभागाकडून कळविण्यात आल्यानंतरच कार्यालयात यावे. 

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

अत्यंत तातडीचे टपाल , संदेश हे ईमेलव्दारे पाठविण्यात येणार आहेत. अभ्यागत यांचे पत्र तसेच मुख्यालयातील दैनंदिनी टपाल व इतर महत्वाची पत्रे स्वीकारण्यासाठी तळ मजल्यावर टपाल कक्ष उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी अभ्यागतांनी तक्रार अथवा निवेदन तळमजल्यावरील टपाल कक्षात दाखल करावे. केवळ अत्यंत तातडीचे प्रत्यक्ष कार्यालयीन काम आणि कोविड -19 संबंधित बाबीकरीता प्रवेशपत्र संबंधित अभ्यागतांना टपाल कक्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  कार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच थर्मल गनव्दारे शरीराचे तापमानाची नोंद घेतली जाईल. लक्षणे आढळून आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. सोशल डिंस्टन्सींगचे पालन करणे बंधनकारक आहे. कार्यालयात येणाऱ्या अभ्यागताने प्रवेशद्वाराजवळील नोंदवहीमध्ये स्वत:च्या नावाची व मोबाईल नंबरची नोंद करावी.