पुणेकरांना गर्दी टाळाच! 7 दिवसांत कोरोनाने घेतली उसळी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 February 2021

राज्यातील पहिला रुग्ण गेल्या वर्षी ९ मार्चला पुण्यात आढळला. त्यानंतर सातत्याने पुण्यात रुग्णांची संख्या वाढत गेली. शहरात आतापर्यंत दहा लाख ८९ हजार ७९३ रुग्णांना कोरोना झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरात झाली. त्यात गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे दोन हजार १२० रुग्ण आढळले होते.

पुणे : शहरात ८३ दिवसांनंतर चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या पाचशेपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. गेल्या सात दिवसांमध्ये दोन हजार ६०० जणांना कोरोनाचे निदान झाले. त्यामुळे पुणेकरांना गर्दी टाळाच, असा स्पष्ट संदेश आरोग्य खात्याने दिला आहे.

राज्यातील पहिला रुग्ण गेल्या वर्षी ९ मार्चला पुण्यात आढळला. त्यानंतर सातत्याने पुण्यात रुग्णांची संख्या वाढत गेली. शहरात आतापर्यंत दहा लाख ८९ हजार ७९३ रुग्णांना कोरोना झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरात झाली. त्यात गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे दोन हजार १२० रुग्ण आढळले होते. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने रुग्णांची संख्या कमी झाली. नवीन वर्षात एका दिवसात निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८ पर्यंत खाली आले. त्यामुळे कोरोनाचा धोका टळला, आता पुणे कोरोनामुक्त असा समज करून पुणेकर बिनधास्त झाले. या सर्वांचा परिणाम म्हणजे २५ जानेवारीला असलेली ९८ रुग्णांची संख्या अवघ्या २५ दिवसांमध्ये तब्बल ४२९ ने वाढून ५२७ झाली.

May be an image of text that says "600 500 कोरोनाबाधीतांची संख्या 400 331 354 527 300 428 465 200 309 193 100 0 फेब्रुवारी 13 14 15 16 17 19 19"

का वाढतोय कोरोना?
१) हवामान सतत होणाऱ्या बदलामुळे विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण
२) सकाळी उन्हाचा चटका, दुपारी पाऊस आणि रात्रीचा गारठा यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढला
२) अनावश्यक वाढलेली गर्दी हे देखिल महत्त्वाचे कारण
३) लग्न कार्य, सण-समारंभ याला मोठ्या संख्येने उपस्थिती
४) अनावश्यक प्रवास करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले

May be an image of text that says "2500 2120 2000 ਵष्टीक्षेपात पुण्यातील कोरोना उद्रेक 1500 1000 500 549 0 528 16 सप्टेंबर 2020 527 15 आँक्टोबर 山 98 28 नोव्हेंबर 25 जानेवारी 19 फेब्रुवारी"
कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांना गर्दी वाढत आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करून अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे, ही काळाची गरज आहे.
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Corona Update Covid-19 New Patients