esakal | Pune Corona Update: १८ एप्रिलपासून ऍक्टिव्ह रुग्णसंख्या घटली २० हजाराने
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Corona Update: १८ एप्रिलपासून ऍक्टिव्ह रुग्णसंख्या घटली २० हजाराने

Pune Corona Update: १८ एप्रिलपासून ऍक्टिव्ह रुग्णसंख्या घटली २० हजाराने

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : शहरात आज तीन हजारांच्या जवळपास नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४,४४,५३९ वर पोहोचली आहे. सध्या पुण्यामध्ये ३६,५८६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यात आज एकूण ४,६७३ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह पुण्यातील आजवर एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही ४,००,६४९ वर पोहोचली आहे. पुण्यात आज एकूण १७ हजारहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह पुण्यात आजपर्यंत एकूण २२,६२,९८१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. पुण्यात आज जवळपास 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत पुण्यात सात हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: सासवडमध्ये तपासणी किटच संपले, चाचण्यांचा वेग मंदावल्याने मनस्ताप

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ३०४ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३६ हजार ५८६ रुग्णांपैकी १,४०३ रुग्ण गंभीर तर ६,४०२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात १७ हजार ११८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २२ लाख ६२ हजार ९८१ इतकी झाली आहे.

शहरातील ४ हजार ६७३ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६४९ झाली आहे. पुणे शहरात आज नव्याने २ हजार ८३७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ४४ हजार ५३९ इतकी झाली आहे. आज पुण्यात नवे २८३७ रुग्ण सापडले असले तरीही आज कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा त्याहून दुप्पटीच्या आसपास आहे. पुण्यात आज तब्बल ४६७३ रुग्ण बरे झाले आहेत. १८ एप्रिलपासून ऍक्टिव्ह रुग्णसंख्या २० हजार ०५० ने घटली आहे, ही देखील एक दिलासादायक बाब आहे.