पुण्याच्या दक्षिण भागाचा सेनानी : अप्पा रेणुसे

Appa-Renuse
Appa-Renuse

काही व्यक्तिमत्त्वे मुळात अशी असतात, की ती कायमच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. योग्य वेळी योग्य सल्ला मिळण्याचं ठिकाण म्हणूनच लोक त्यांच्याकडं पाहतात. असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अप्पा रेणुसे. आपल्या कार्यकर्तृत्वातून पुण्याच्या दक्षिण भागात छाप उमटविलेल्या अप्पांनी लॉकडाउनच्या काळात वाखाणण्याजोगी भूमिका बजावली. त्यांना दक्षिणेचा सेनानी म्हटले तरी वावगे ठरू नये.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा बहुविध स्तरांवर कार्यरत असलेले आप्पा हे साऱ्यांचंच लाडकं व्यक्तिमत्त्व. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असले तरी अन्य पक्षांतही त्यांना तेवढाच मान. मोठा नेता असो की छोटा कार्यकर्ता, आप्पा त्याच्या हृदयात कधी घर करतील, हे त्यांनाही उमगणार नाही. त्यातूनच त्यांचा स्वतःचा असा जनसमुदाय तयार झाला आहे. कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, बालाजीनगर हा पुण्याच्या दक्षिणेकडील भाग म्हणजे आप्पांचे कार्यक्षेत्र. त्यांनी आपल्या कार्यकौशल्यातून या भागात स्वतःची प्रतिमा तयार केली आहे. त्याच प्रतिमेला जागत आप्पांनी कोरोनाच्या काळात आपल्यातील समाजसेवक जागा ठेवला.

आपल्या परिसरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, यासाठी आप्पा जातीने लक्ष देत होते. या भागातील राजकीय नेते, कार्यकर्ते, विविध संघटना, प्रशासकीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून आप्पा त्यांना वरचेवर सल्ले देत होते. प्रशासकीय पावलेही त्यांच्या सल्ल्यानुसारच उचलली जात होती. अर्थात या भागात कोरोनाने शिरकाव केला असला तरी, आप्पांच्या रणनीतीमुळे त्याला बऱ्याच प्रमाणात आळा बसला, हेदेखील तितकेच खरे. 

लॉकडाउनच्या काळात आप्पांचा दिवस सुरू होत होता तो अधिकारी, राजकीय नेत्यांना फोन करूनच. आपल्या भागातील परिस्थितीचे ते रोजच्या रोज अपडेट घेत होते. शिवाय एखाद्या भागात आरोग्य यंत्रणेची अथवा अन्य कशाची मदत लागली तर त्याची व्यवस्था आप्पा तातडीने करून देत असत. एखाद्या भागात रुग्ण आढळला तर आप्पा त्या भागातील कार्यकर्त्यांना फोन करून परिस्थितीवर लक्ष ठेवून असत. तेथील नागरिकांना धीर देण्याचे काम ते करीत. त्यामुळे आपल्या पाठीशी कोण तरी आहे, अशी भावना लोकांमध्ये होत होती. त्यातून त्यांना एक प्रकारे लढण्याचे बळ मिळत होते. हे बळच या भागातील कोरोनाला अटकाव करण्यासाठी उपयोगी ठरलं.

धनकवडी परिसरात आप्पांचे शैक्षणिक कार्य सर्वज्ञातच आहे. शिक्षण संस्था चालवीत असलेल्या आप्पांचा विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी जवळचा संबंध. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची ते विशेष काळजी घेत होते. शिक्षकांना रोजच्या रोज फोन करून ते याबाबत सूचना देत होते.

शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा तातडीने उभारून अप्पांनी मुलांच्या अभ्यासात कोणताही खंड पडू दिला नाही. केवळ ही यंत्रणा उभारून ते थांबले नाहीत, तर हे शिक्षण मुलांना समजते का, काही अडचणी येतात का याची रोजच्या रोज विचारपूस करीत होते. एक संस्थाचालक मुलांची जातीने अशा पद्धतीने काळजी घेतोय, हे पाहून पालकही भारावले. अनेक पालकांनी अप्पांना फोन करून धन्यवाद दिले.

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकार आपल्या परीने प्रयत्न करीतच आहे. मात्र, ही जबाबदारी केवळ सरकारचीच आहे, असे नाही. नागरिकांची साथही त्यासाठी महत्त्वाची आहे. सर्वांनी एकदिलाने काम केले, तर या महामारीतून आपण सहीसलामत बाहेर पडू.
- अप्पा रेणुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com