ऑनलाईन वर्गासाठी धडपडणाऱ्या अश्विनी भागवत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत 
कोरोनाची प्रचंड भीती असूनही घरोघरी पोचत वृत्तपत्र वाटणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सुरक्षिततेची काळजी अश्‍विनीताई आणि सागर भागवत घेत होते. या लोकांना मास्क, सॅनिटायझर, हँड ग्लोव्हज्, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याच्या गोळ्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे अशा परिस्थितीतही वृत्तपत्र वाटणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

कोरोनाच्या दहशतीनं शाळा-महाविद्यालयांची दारे उघडेनाशी झालीत; कॅलेंडरप्रमाणे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पंधरवडा झाला आहे. पण, एकाही शाळेची घंटा वाजलेली नाही. मात्र, पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्‍विनी भागवत यांनी बेधडकपणे वर्ग भरविण्याचे धाडस केलंय. त्यांच्या पुढाकारातून विद्यार्थी धडे गिरवू लागलेत; तेही ऑनलाइन.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने अश्‍विनीताईंचा हा एज्युकेशन फंडा प्रभावी ठरतोय. म्हणजे, प्रत्यक्ष वर्ग भरत नसले, तरीही आठवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थीही रोज न चुकता वेळेत आणि तितक्‍याच शिस्तीत शिकतआहेत. 

Image may contain: 6 people, people standing, text that says "रुप्रर्र्भी पाटी प्रभागातील गरजूंना किट वाटप करताना नगरसेविका अश्विनी भागवत व सागर भागवत."

कोरोनाची साथ कमी होण्याचे नाव घेत नसल्याने शाळा-कॉलेज कधी सुरू होईल, हे सांगणे अवघड आहे. मात्र, ते सुरू होण्याची वाट पाहण्यापेक्षा अश्‍विनीताई आणि त्यांचे पती सागर भागवत यांनी आर. एस. ॲकॅडमीच्या सहकार्याने मोफत ऑनलाइन क्‍लासेसचा ‘श्रीगणेशा’ केला आहे. त्यात शेकडो विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांकरिताच अश्‍विनीताई आणि सागर भागवत काम करीत आहेत असे नाही; तर लॉकडाउनमध्ये लोकांना अन्नधान्य वाटण्यापासून त्यांच्या आरोग्यासाठी सगळ्याच पातळ्यांवर लढत आहेत. जेव्हा लोकांना घराबाहेर पायही ठेवणे शक्‍य नव्हते; तेव्हा या दोघांनी दोन हजारांहून अधिक कुटुंबांना मोफत भाजीपाला पुरविला. कोरोनाच्या नावाने लोक घाबरत असतानाच आपल्या प्रभागासह परिसरात औषध फवारणी करीत, सार्वजनिक स्वच्छतेला या दांपत्याने प्राधान्य दिले. दुसरीकडे, सोसायट्यांमध्ये सॅनिटायझर स्टॅण्डची व्यवस्था करीत, तेथील नागरिकांच्या वर्दळीसाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे सोसायट्यांचा परिसर सुरक्षित राहू शकला.

चार हजार लोकांची आरोग्य तपासणी
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अश्‍विनीताईंनी लोकांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यानंतर हजारो मास्क, आर्सेनिकचे वाटप केले. त्याआधी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिर घेऊन सुमारे चार हजार लोकांत कोणती अन्य लक्षणे आहेत का, हेही जाणून घेऊन त्यांनी उपचार व्यवस्था उभी केली. सुदैवाने या तपासणीत कोरोना रुग्ण सापडला नसल्याचे समाधान भागवत यांना आहे. 

प्रत्येक घरात चिंता आहे, ती मुलांच्या शिक्षणाची. ती काही प्रमाणात कमी करण्यासाठी ऑनलाइन क्‍लासेस घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न मी करीत आहे. त्याला विद्यार्थी, पालकांची पसंती मिळत आहे. त्याशिवाय वेळोवेळो आरोग्य तपासणी करून संशयितांवरील उपचाराला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे कोरोना रोखणे शक्‍य होत आहे. 
- अश्‍विनी भागवत, नगरसेविका, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors corporator ashwini bhagwat