लोकांशी जोडलेले नेतृत्व दीपक मानकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’ हा अभंग सर्वश्रुतच आहे. मग तो आहे तरी कुठे, याचे उत्तर म्हणजे माणसाचं हृदय; पण हृदयाचं हे मोठेपण साऱ्यांच्या ठायी थोडंच का असतं! त्यासाठी हवा असतो तो माणुसकीचा ओलावा. हाच ओलावा दक्षिणेतील शेकडो मजूर कामगारांनी नगरसेवक दीपक मानकर यांच्या रूपाने अनुभवला. 

‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’ हा अभंग सर्वश्रुतच आहे. मग तो आहे तरी कुठे, याचे उत्तर म्हणजे माणसाचं हृदय; पण हृदयाचं हे मोठेपण साऱ्यांच्या ठायी थोडंच का असतं! त्यासाठी हवा असतो तो माणुसकीचा ओलावा. हाच ओलावा दक्षिणेतील शेकडो मजूर कामगारांनी नगरसेवक दीपक मानकर यांच्या रूपाने अनुभवला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने आपल्या देशावरही जाळं टाकायला सुरुवात केली. हा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी लॉकडाउनचं हत्यार उपसण्यात आलं. सुरक्षितता म्हणून लोकांना घरातच बसणं अनिवार्य झालं. यात सर्वाधिक हाल झाले ते हातावरचं पोट असणाऱ्या मजुरांचे. दिवसभर काम केलं तर रात्रीचं जेवण, अशी त्यांची अवस्था; पण लॉकडाउनमुळे हाताचं काम गेल्याने करायचं काय, खायचं काय, कच्च्याबच्च्यांना जगवायचं कसं असे अनेक प्रश्‍न त्यांच्यापुढे आ वासून उभे राहिले. 

हे मजूर प्रामुख्याने दक्षिण भारतातील. कोथरूड, कर्वेनगर परिसरात त्यांची संख्या मोठी होती. बांधकाम साइटवर काम करून ते उदरनिर्वाह करीत होते. हाताचं काम गेल्याने या लोकांपुढे खाण्यापिण्याचा प्रश्‍न उभा राहिला. त्यांना डोळ्यांपुढे आपला गाव दिसू लागला; पण जायचं कसं, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे होता. त्यांनी पोलिसांपुढे आपली कैफियत मांडली. त्यांना गावी पाठविण्याची तयारी पोलिसांनी दाखविली खरी; पण जाण्याची व्यवस्था करणार कोण, हा प्रश्‍न होता. त्याचवेळी पोलिसांपुढे एक नाव उभं राहिलं ते दीपक मानकरांचं. या अडचणीच्या वेळी त्यांची नक्कीच मदत मिळेल, याचा विश्‍वास पोलिसांनाही होता. त्यातूनच त्यांनी मानकर यांच्याशी संपर्क साधला. 

मदतीसाठी कोणालाही आणि कधीही नाही न म्हणणाऱ्या दीपकभाऊंनी पोलिसांना तत्काळ हो भरला. पोलिसांचा फोन ठेवताच भाऊंनी दुसऱ्याच क्षणी फोन फिरवून मजुरांच्या जाण्यासाठी चार बसची व्यवस्था केली. वाटेत या मजुरांना कसलीही अडचण येऊ नये म्हणून आवश्‍यक ती औषधे, अन्नपाण्याचीही सोय केली. अशा संकटकाळात देवासारख्या धावून आलेल्या भाऊंचे ऋण फेडणार कसे, ही कृतज्ञता या मजुरांच्या डोळ्यांत दाटली नसती तर नवलच! गावी जाण्यासाठी गाडीत बसताना जो तो भाऊंना लाख लाख धन्यवाद देत होता. या दृश्‍याचे साक्षीदार ठरलेल्या कार्यकर्त्यांचाही ऊर तेव्हा अभिमानाने भरून आला होता. 

नगरसेवक म्हटलं, की त्याचं कार्य हे त्याच्या प्रभागापुरतंच मर्यादित असतं; पण दीपकभाऊ हे त्याला पूर्णपणे अपवाद. समाजाशी नाळ जोडलेला हा कलंदर माणूस केवळ प्रभागापुरता मर्यादित कधी राहिलाच नाही, त्यामुळेच आजही संपूर्ण शहरभर त्यांच्या नावाचं वलय आहे. हे वलय निर्माण झालं आहे ते त्यांच्या कर्तृत्वाने. आजही कोणाला काहीही मदत हवी असली, तरी त्यांची पावलं दीपकभाऊंकडे वळतात. भाऊदेखील आपल्या परीने शक्‍य ती मदत केल्याखेरीज राहत नाहीत. त्यांच्यातील हा दातृत्वाचा गुणच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शिकवणुकीतून लोकांसाठी मदतीचा डोंगर उभा करता आला. पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनामुळेच एवढ्या प्रमाणात लोकांशी जोडला गेलो आहे. माणुसकीची ही नाळ तुटू देणार नाही. 
- दीपक मानकर, नगरसेवक, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors corporator deepak mankar