कोरोनाला हरवून दिपालीताई पुन्हा उतरल्या रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

आक्रमक कार्यपद्धत
महापालिकेत खूप वर्षांनी विरोधी पक्षनेतेपद महिलेकडे आले आहे. हे पद महिलेकडे असल्याने सुरुवातीला काही प्रश्‍न उपस्थित केले गेले. त्या प्रश्‍नांची उत्तरे आपल्या कामातून देत दीपाली धुमाळ या एक लढवय्या नेत्या ठरल्या. विरोध म्हणूनच नाही; तर पुणेकर नागरिक या नात्याने त्या सभागृह आणि सभागृहाबाहेर आक्रमकपणे काम करताना दिसत आहेत. पुणेकर सुरक्षित राहतील, यासाठी मी झटत राहणार असल्याचे त्या सांगत आहेत.

पुणेकरांना जपताना स्वत:वर झालेल्या कोरोनाच्या हल्ल्याला तितक्‍याच ताकदीने परतून लावलेल्या महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ कोरोनाविरोधातील लढाईसाठी रणांगणात उतरल्या आहेत. ‘मी ठणठणीत आहे’ असे सांगत त्यांनी वारजे-कर्वेनगरवासीयांसह संबंध पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी नवी ‘इनिंग’ सुरूही केली आहे. मात्र, प्रत्यक्षात लोकांत येण्याऐवजी त्या आणि त्यांचे पती बाबा हे ‘झूम’च्या माध्यमातून गरजूंशी जोडले जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाउमुळे वारजे-माळवाडी आणि कर्वेनगरमधील रहिवासी, कामगारवर्ग त्रस्त झाला. सलग तीन महिने काम नसल्याने या घटकावर पोटाला चिमटा घेण्याची वेळ ओढावली. मात्र, ही वेळ कोणाच्याही घरात नसावी, हे जाणून असलेल्या दीपाली धुमाळ आणि बाबा मदतीला धावून गेले. जीवनावश्‍यक वस्तू देत प्रत्येकाला घरातच चार घास मिळवून दिले. वस्त्या-झोपडपट्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी दोघेही नेहमीच फिरत राहिले. कोरोनाचे रुग्ण, संशयित, त्यांच्यावरचे उपचार, अंत्यसंस्करापर्यंत सगळ्या गोष्टींकडे या दोघांचे लक्ष राहिले. धुमाळ यांच्या प्रयत्नांना पहिल्या एक-दोन टप्प्यांत वारजे, कर्वेनगरात कोरोनाला लगाम बसला. वर्षानुवर्षे वारज्यात असलेल्या कामगारांनाही धुमाळ दांपत्याने आपुलकी दाखविली. या लोकांच्या किमान गरजाही पुरविण्यासाठी धुमाळ यांचाच पुढाकार होता.

Image may contain: one or more people, people standing and people sitting, text that says "PeI ਚसਗा प्रभागातील आरोग्य सेवेची पाहणी करताना दीपाली धुमाळ"

विरोधी पक्षनेत्या म्हणून धुमाळ यांना आपल्या प्रभागासोबत संपूर्ण शहराच्या कारभारात बारईकाने लक्ष घालणे गरजेचे होते. याकाळात पुणेकरांना कोणत्या सुविधा मिळत आहेत, त्यांचा दर्जा काय, यावर करडी नजर ठेवत दीपाली धुमाळ रोज सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवत आहेत. महापालिकेपासून, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालयांच्या बैठका, नेते, मंत्र्यांच्या अगदी मुंबईतील बैठकांनाही हजेरी लावून धुमाळ पुणेकरांचे नेतृत्व करीत राहिल्या. याचकाळात दीपाली धुमाळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. उपचारानंतर त्या बऱ्या झाल्या आहेत. नुसत्या बऱ्या नव्हे, तर त्या कामालाही लागल्या आहेत. 

घाबरण्यापेक्षा शिस्त पाळून पुणेकरांनी कोरोनाला रोखले पाहिजे. या लढ्यात आपण सगळे सुरक्षित राहू. जेवढे काही करता येईल, ते केले जात आहे. या काळातील सर्व सुविधा प्रत्येकापर्यंत पोचत आहेत का, यावर मी स्वत: लक्ष देत आहे. पुणेकर कोरोनाची लढाई जिंकतील.  
- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors corporator dipali dhumal