गरजूंच्या चेहऱ्यावर हर्ष आणणारे हर्षवर्धन मानकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

वडिलांच्या खांद्याला खांदा
वडील दीपक मानकर राजकारणात असले, तरी हर्षवर्धन मात्र व्यवसायात रमले आहेत; परंतु, पुण्यात कोरोनाची ‘एन्ट्री’ झाल्यापासून त्याचा धोका ओळखलेले हर्षवर्धन कोरोनाविरोधातील मोहिमेत काम करीत आहेत. दीपक मानकर यांच्याकडील मदत नेमक्‍या लोकांपर्यंत पोचतेय का, ती वेळेत मिळाली का, यांपासून मदत कार्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी हर्षवर्धन यांनी झोकून दिले आहे. त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाने गरजूंसाठी अजित भोजन योजना सुरू केली आहे.

एकीकडे गरिबांची भूक भागविण्यासाठी नगरसेवक दीपक मानकर लढताहेत; तर दुसरीकडे त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन मानकर हे लोकांच्या आरोग्यासाठी आजही फिरताहेत. एखाद्या व्यक्तीला हलका ताप, सर्दी आणि खोकला असल्याची साधी खबर कानावर येताच त्या व्यक्तीच्या दारात डॉक्‍टर धाडून हर्षवर्धन हे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हर्ष आणत आहेत. दाट लोकसंख्येच्या कोथरूडमधील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांत कोरोनाविरोधात ते ‘फाइट’ करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोथरूडमधील बहुतांशी भागापर्यंत आपल्या मदतीचा हात पसरविणाऱ्या मानकर कुटुंबीयांच्या मोहिमेत सहभागी झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हर्षवर्धन यांचा कायमच प्रयत्न असतो. जे कार्यकर्ते गरजूंसाठी धावत आहेत, अशा कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही नगरसेवक दीपक मानकर आणि हर्षवर्धन यांचाच आधार आहे.

Image may contain: one or more people, text that says "जि्ापीठ कुष्टी लोकांसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांची तसेच मजुरांची विचारपूस करताना हर्षवर्धन मानकर."

मदतीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना जीवनाश्‍यक वस्तू पुरविण्यापासून त्यांच्या हातात चार पैसे राहावेत, म्हणून गरजूंना काम देण्याचा मानकर यांचा प्रयत्न दिसून आला. त्यामुळे मदतीतूनही रोजगार उपलब्ध झाला आहे. 

लॉकडाउनमध्ये सोसायट्यांची दारे बंद झाल्याने घरकाम करणारा वर्ग अर्थात मोलकरणींचे हाल होण्याची भीती होती. मात्र, ती वेळ ओढवू नये, याकरिता दीपक मानकर यांनी मोलकरणींना प्राधान्य देत, त्यांना जेवण पुरविण्याची व्यवस्था केली.

कोरोनाच्या साथीबरोबरच अन्य आजारही बळविण्याच्या शक्‍यतेने हर्षवर्धन यांनी आरोग्य यंत्रणा विस्तारली. ज्यामुळे लोकांना घरीच उपचार मिळाले. खासगी डॉक्‍टरांसह परिचारिका उपलब्ध करून देत केळेवाडी, सुतारदरा या भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांची घरोघरी तपासणी करण्यात आली. ती आजही सुरूच आहे. काही प्रमाणात लक्षणे आढळून आलेल्यांना तातडीने उपचारही पुरविण्यात येत आहेत. केवळ कोरोनाच नव्हे, अन्य आजार असलेल्यांनाही घरीच औषधोपचाराची सोय करून हर्षवर्धन यांनी खऱ्या अर्थाने आरोग्य सेवा व्यापक केली आहे. त्याच वेळी वस्त्या, झोपडपट्‌य्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी स्वतंत्र कामगार नेमून परिसर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न हर्षवर्धन यांनी केला. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये हमखास कोरोना पसरण्याच्या शक्‍यतेला पूर्णविराम मिळाला. त्यामुळेच कोथरूडमधील सोसायट्या आणि बंगल्यांचा भाग ‘कोरोना फ्री’ राहिला.

कोरोनामुळे लोकांच्या अन्य गरजा म्हणजे, सार्वजनिक स्वच्छता, शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये, याकरिता मी प्रयत्न करीत आहे. रुग्ण आणि संशयितांना वेळेत उपाचर झाल्यास कोरोना आवाक्‍यात राहू शकतो, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची व्यापकता वाढवीत आहे. 
- ॲड. हर्षवर्धन दीपक मानकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors corporator harshvardhan mankar