अविरत अन्नदान करणारा नेता : करण मानकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

मुंबईतील धारावीत कोरोना शिरला आणि अवघ्या महाराष्ट्राची चिंता वाढली. झोपडपट्ट्यांत कोरोनाचा शिरकाव झाला तर, त्याला रोखणे अवघड ठरणार होते. म्हणूनच पुण्यातील झोपडपट्ट्यांही चिंतेच्या ठरल्या आणि त्यावरचे उपाय शोधण्याकरिता साऱ्या यंत्रणा आपापल्या परीने कामाला लागल्या. मात्र, लॉकडाउनच्या पहिल्यावहिल्या दिवसापासून नगरसेवक दीपक मानकर यांनी कोथरूडमधील वस्त्या, झोपडपट्ट्या सुरक्षित ठेवल्या.

लॉकडाउनमध्ये नगरसेवक दीपक मानकर हे रोज चार हजार लोकांना घरपोच जेवण पुरवित होते. याची संपूर्ण व्यवस्था त्यांचे चिरंजीव करण मानकर पाहत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईतील धारावीत कोरोना शिरला आणि अवघ्या महाराष्ट्राची चिंता वाढली. झोपडपट्ट्यांत कोरोनाचा शिरकाव झाला तर, त्याला रोखणे अवघड ठरणार होते. म्हणूनच पुण्यातील झोपडपट्ट्यांही चिंतेच्या ठरल्या आणि त्यावरचे उपाय शोधण्याकरिता साऱ्या यंत्रणा आपापल्या परीने कामाला लागल्या. मात्र, लॉकडाउनच्या पहिल्यावहिल्या दिवसापासून नगरसेवक दीपक मानकर यांनी कोथरूडमधील वस्त्या, झोपडपट्ट्या सुरक्षित ठेवल्या. झोपडपट्ट्यांतील एकही व्यक्ती जीवनावश्‍यक वस्तूसाठीही आपल्या घराचा उंबरा ओलांडणार नाही, याचा आराखडा आखला.

Image may contain: one or more people, people standing and indoor, text that says "गरजूंना आवश्यक वस्तू वाटण्यासाठी पूर्वतयारी करताना करण दीपक मानकर."

लॉकडाउन मनावर घेत मानकर आणि त्यांचे कार्यकर्ते लोकांना घरी बसण्याचे आवाहन करीत राहिले. मात्र, ही मंडळी घराबाहेर नाही आली तर हातावरचे पोट असणाऱ्यांच्या जगण्याचे काय, हा प्रश्‍न मानकर यांच्या सहृदयाने तत्काळ हेरला. त्यावर फारसा वेळ न घालविता सुमारे चार हजार लोकांच्या जेवणाची सोय केली. ते रोज सकाळी आणि सायंकळी त्यांच्या घरात पोचेल, याकरिता व्यवस्था उभारली. त्यासाठी नारायण पेठेत भले मोठे स्वयंपाक घर (किचन) तयार करीत, तिथे स्वयंपाक्‍यांची फौज आणली. तेथे रोज चार हजार जणांचे जेवण तयार होऊ लागले. हे जेवण व्यवस्थित पॅकिंग करून केळेवाडी, सुतारदऱ्यातील झोपड्यांत पोचू लागले.

हा उपक्रम एक-दोन दिवस नव्हे, तर तब्बल साठ दिवस अविरतपणे सुरू होता. रोज सकाळ-सायंकाळ जेवणाची सोय होत असल्याने रहिवाशांना संकट काळात मोठा आधार मिळाला. त्यामुळे लॉकडाउनची अंमलबजावणी काटेकोर झाली. परिणामी, कोरोनाला आपोआपच आळा बसला. रुग्णसंख्या आटोक्‍यात राहण्यास मदत झाली.

मानकर यांनी हा उपक्रम राबविला नसता, तर केळेवाडीची धारावी होण्यास वेळ लागला नसता, असे अधिकारी बोलून दाखवत आहेत. या सर्व उपक्रमात मानकर यांचे कार्यकर्तेही हिरिरीने सहभागी झाले होते. त्यांच्यामुळेच हे शक्‍य झाल्याचे मानकर सांगतात. दिलीप कानडे, विशाल अग्रवाल, सागर जोशी, संजय बेरणेकर, मयूर घोडके, सचिन मानकर, रोहिदास जोरी, विक्रम अगरवाल, ज्ञानेश्‍वर पाटोळे, नामदेव मानकर, संकेत बलकवडे, स्वप्नील खवले आदी कार्यकर्त्यांनी यामध्ये झोकून देऊन काम केले.

कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर न पडणे हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे त्यांना घरपोच जेवण पोचविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
- करण दीपक मानकर, अध्यक्ष, दिवा प्रतिष्ठान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors corporator karan mankar