उपायांची तटबंदी उभारणाऱ्या लक्ष्मी दुधाणे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

माणुसकीचा झरा
वस्त्या, झोपडपट्ट्यांमधील रोजंदारी करणाऱ्या हजारो कुटुंबांसह स्वप्नील यांनी रिक्षाचालकांच्या कटुंबीयांनाही आधार दिला. या भागात मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक राहतात. लॉकडाउनमध्ये पुण्यातील ५० हजारांहून अधिक रिक्षाचालकांचे प्रचंड हाल झाले. मात्र, कर्वेनगर-वारजे परिसरातील रिक्षाचालकांना जीवनाश्‍वयक वस्तू पुरवून दुधाणे यांनी माणुसकीचा झरा खळखळत ठेवला. लॉकडाउनमध्ये रस्त्यांवर उतरून वृत्तपत्र वाटणाऱ्या विक्रेत्यांनाही दुधाणे कुटुंबीयांनी दिलासा दिला. या घटकाला रोजच्या गरजा भागविता याव्यात, याकरिता त्यांनी रोख स्वरूपातही मदत केली.

साठीवरच्या ज्येष्ठांनी घराबाहेर यायचेच नाही, असा सरकारी दंडक सांभाळत नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांनी कर्वेनगरला जपलं. कोरोनाची नजरही रहिवाशांवर पडू नये म्हणून कर्वेनगराभोवती मजबूत उपायांची तटबंदी उभारत त्यांनी तब्बल लाख-दीड लाख लोकसंख्येचा भाग कोरोनापासून लांबच ठेवला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरपोच जेवण, धान्याचे किट देतानाच आरोग्य तपासणी, उपचार यंत्रणा, सावर्जनिक स्वच्छता आणि जागृतीची मालिका नगरसेविका लक्ष्मी दुधाणे आणि त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे यांनी सुरू ठेवली. किंबहुना अजूनही ती सुरूच आहे.

Image may contain: one or more people, people standing, people walking and outdoor, text that says "कोरोनाविषयी जनजागृती करताना लक्ष्मी दुधाणे आणि स्वप्नील दुधाणे."

कर्वेनगरमध्ये सोसायट्या असल्या तरी झोपडपट्ट्याही आहेत. त्यात हातावर पोट असणारा घटक सामावला आहे. लॉकडाउनमुळे तो पूर्णपणे थांबला. मात्र, नेमक्‍या वेळी तेवढ्याच तत्परतेने मदतीचा हात देत दुधाणे यांनी या कुटुंबांना, गरजूंना धीर दिला. त्यामुळे कर्वेनगर आणि परिसर धडधाकड राहिल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात कोरोनाचा धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वत: स्वप्नील नेहमीच रस्त्यांवर उतरले. कोथरूड-कर्वेनगरमधील दोनशे सोसायट्यांत सॅनिटायझर स्टॅंड उभारले. १५ हजार कुटुंबांना आरोग्य किट, मूळ गावी जाणाऱ्या नऊशे जणांच्या पासची सोय केली.

ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट आणि जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण अशा अनेक कामांचा सपाटा दुधाणे यांचा सुरूच होता. बंदोबस्तावरील पोलिस, जिवाची पर्वा न करता लढणारे डॉक्‍टर, पारिचारिका यांच्यासाठी जमेल तेवढी मदत स्वप्नील करीत आहेत. त्याचवेळी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी आखलेल्या योजना अमलात आणत विकासाचा वेगही लक्ष्मीवहिनी आणि  स्वप्नील यांनी कायम ठेवला आहे. मात्र यापुढे आपल्या प्रभागात पुरेशा प्रमाणात आरोग्य यंत्रणा असेल, याची काळजी घेत दुधाणे यांनी नव्याने व्यवस्था विस्तारण्याचे नियोजन केले आहे.

नागरिकांना आरोग्यसेवा देतानाच त्यांना धीर दिला. अनेकांना घर चालविण्यासाठी मदत केली. तसेच सावर्जनिक स्वच्छता राखण्यात यश आल्याने कोरोनाचा संसर्ग पसरू शकला नाही. त्यासाठी कर्वेनगर-कोथरूडमधील प्रत्येकानेच प्रयत्न केले आहेत. 
- लक्ष्मी दुधाणे, नगरसेविका, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors corporator laxmi dudhane