संकटात कार्यकर्त्यांची फळी उभी करणारे प्रशांत जगपात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

लोकसेवेसाठी रस्त्यावर
कोरोनाच्या संकट काळात जगताप एकही दिवस घरात न बसता जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांसोबत सतत काम करीत आहेत. हे संकट आटोक्‍यात येण्यासाठी पुढील काही दिवसांत प्रभागातील नागरिकांसाठी मास्क व प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ‘आर्सेनिक ३०’ या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी कोरोनाची भीती एवढी घेतली होती, की साधा खोकला, सर्दी झाली तरी लोक घाबरून जायचे. त्यातच खासगी डॉक्‍टरांनीही दवाखाने बंद ठेवले होते. अशा वेळी माजी महापौर व नगरसेवक प्रशांत जगताप देवदूतासारखे नागरिकांच्या मदतीला धावले. वानवडी भागात ‘डॉक्‍टर आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना योग्य वेळी आरोग्यसेवा पुरविण्याचे काम त्यांनी केले. या सेवेचा दहा हजारांवर जणांनी लाभ घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे कामधंदा बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा हजारो लोकांचे जगताप अन्नदाता बनले. या कुटुंबांना रोज पोटभर आणि पौष्टिक जेवण मिळावे, यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरले. तसेच कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करून प्रभागात कोणी उपाशी राहणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. याशिवाय जवळपास आठ हजार गरजू कुटुंबांना धान्य वाटप केले. प्रभागातील सर्व स्तरांतील नागरिकांचा विचार करून सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ‘शेतकरी आठवडा बाजार’द्वारे सोसायटीमध्ये स्वस्त व ताजा भाजीपाला उपलब्ध करून दिला.

Image may contain: 2 people, people standing, text that says "राज्य राखीव दलाच्या जवानांना आरोग्याचे किट वाटप करताना प्रशांत जगताप."  

प्रभागात स्वच्छता करणारे सर्व सफाई कर्मचारी आणि आरोग्य अधिकारी यांना सॅनिटायझर, मास्क व औषधांचे वाटप केले. या संकट काळात काम करत असलेल्या या मंडळींचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. तसेच कै. गेनूजी शिवरकर हॉस्पिटल व छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमधील डॉक्‍टर-कर्मचाऱ्यांना तसेच वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. 

जगताप यांनी फक्त प्रभागापुरता विचार न करता फ्रंट लाइनवर काम करणारे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आपुलकीने चौकशी करत त्यांना सॅनिटायझर, मास्क व औषधांचे वाटप केले. यामध्ये वानवडीतील राज्य राखीव पोलिस दलातील जवान, वानवडी, कोंढवा, हडपसर, लष्कर, मुंढवा पोलिस ठाण्यातील कर्मचारी, अधिकारी तसेच अग्निशामक दलातील जवान या सर्वांना आवश्‍यक त्या वस्तूंचे जगताप यांनी वाटप केले. ज्येष्ठांबरोबरच लहान मुलांची काळजी असणाऱ्या जगताप यांनी सिंधूताई सपकाळ यांच्या आश्रमातील अनाथ मुलांना धान्य वाटप केले. सोबतच कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझर व मास्क दिले. या कठीण प्रसंगात जगताप यांनी सहकार्य केल्यामुळे सिंधूताईंनी त्यांना धन्यवाद देतानाच शुभेच्छा दिल्या.

प्रभागातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कार्य करणे ही माझी जबाबदारी आहे. सध्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विविध स्तरांवर काम सुरू आहे. तसेच, भविष्यातही नागरिकांच्या अडीअडचणीच्या काळात मी सदैव तत्पर राहून काम करीत राहणार आहे. 
- प्रशांत जगताप, माजी महापौर व नगरसेवक, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors corporator prashant jagtap