मायेचा घास घराघरांत पोहोचवणाऱ्या प्रियाताई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

लग्नाचीही पेलली जबाबदारी
सोशल डिस्टन्सिंग पाळून जनता वसाहतीत लग्नसोहळेही पार पडत आहेत. मात्र, त्यातून गर्दी होणार नाही, याकडे लक्ष देत प्रियाताई आणि प्रेमराज यांनी काही जणांच्या लग्नाचीही जबाबदार पेलली आहे. मुलींना भांडीकुंडी देण्यासह त्यांना माहेरची साडी व अन्य कपडेही या दोघांनी दिले. तर, मोजक्‍याच वऱ्हाडी मंडळींसाठीची भोजन व्यवस्थाही शिवाजी गदादे यांच्याच किचनमधून झाली. स्वत:चे वय विसरून ते आपल्या मुलांना घेऊन रोज १४-१५ तास काम करीत आहेत.

जिथं खरोखरीच पाय ठेवायलाही जागा नाही अशा जनता वसाहतीतल्या बारा हजार घरांतील तब्बल ४० हजार रहिवासी आजघडीलाही सुरक्षित आणि समाधानी आहेत. पुण्यातल्या या सगळ्यांत मोठ्या, दाटीवाटीच्या जनता वसाहतीत शिरकाव करण्यापासून कोरोनाला रोखण्याची तत्परता दाखविली आहे ती स्थानिक नगरसेविका प्रिया गदादे आणि त्यांचे भाऊ प्रेमराज गदादे यांनी. या बहीण-भावासह चोवीस तास राबणाऱ्या त्यांच्या शे-दोनशे कार्यकर्त्यांमुळे पहिले दोन महिने वसाहतीतल्या एकाही व्यक्तीला कोरोनाने स्पर्शही केला नाही. त्याची कारणेही तशीच आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉ कडाउनच्या पहिल्याच दिवसापासून हजारो लोकांपर्यंत मायेचा घास पोचवत प्रियाताई आणि प्रेमराज घराघरांत पोचले. शिवाजी गदादे यांनी वडिलकीच्या नात्याने किचनसह जेवणाचा दर्जा सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि प्रियाताईंच्या कामाला वेग आला. एक-दोन दिवस नव्हे, तर दोन महिने गरिबांना त्यांच्यामुळे जेवण मिळत राहिले. केवळ जेवण देण्यावरून कोरोना लांब राहणार नव्हता, हे जाणून असलेल्या प्रियाताईंनी आरोग्य व्यवस्था उभारत रोज नागरिकांची तपासणी सुरू केली. पाठोपाठ महापालिका संशयित रुग्णांवर लक्ष ठेवत राहिली. परिणामी, अन्य आजारांच्या रुग्णांना उपचार मिळत राहिले आणि बरेही होऊ लागले. या वसाहतीत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता.

Image may contain: Shreeram Pachindre, outdoor and close-up, text that says "d ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेताना (उजवीकडे) शिवाजी गदादे."

लॉकडाउनमध्ये सवलती आल्या आणि घरपोच जेवण थांबवून प्रियाताईंनी गरजूंना महिनाभराचे धान्य पुरविले. ते संपण्याआधीच नव्या धान्याच्या पिशव्या लोकांपर्यंत पोचविल्या. त्या पोचविण्याचे काम अजूनही सुरूच आहे.

आरोग्य तपासणी करतानाच संबंधित व्यक्तीसाठी औषधोपचाराचीही सोय त्यांनी केली. त्यामुळे जनता वसाहतीतील रहिवाशांना एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा मिळाल्या. त्यामुळे कितीतरी पटींनी कोरोना रुग्ण कमी प्रमाणात आढळून आले. या भागातील सर्वांत मोठा घटक म्हणजे रिक्षा चालक. त्यालाही प्रियाताईंमार्फत पुरेशा प्रमाणात मदत मिळत गेल्याने एकाही रिक्षा चालकाच्या कुटुंबात अडचणी आल्या नाहीत. त्या येऊ द्यायच्या नाहीत, इतकी कौटुंबिक जबाबदारी प्रियाताई व प्रेमराज यांनी घेतली.

लोकांना घरपोच व वेळेत सुविधा मिळाल्यानंतर कोरोनाला रोखू शकतो, हा ‘जनता वसाहत पॅटर्न’ पुढे आला आहे. माझ्या कुटुंबीयांच्या मदतीला लोकांच्या शिस्तीची जोड मिळाल्यानेच आम्ही सारे काही करू शकलो. आमच्या भागातील कोरोना संपेपर्यंत लोकांसाठी कार्यरत राहणार आहे.
- प्रिया गदादे, नगरसेविका, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors corporator priya gadade