...अन् रुपालीताईंमुळे देह विक्रय करणाऱ्या महिलांची चूल पेटली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तरुण, आक्रमक, धडाकेबाज आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारणाऱ्या नेत्या ही रुपालीताई पाटील यांची ओळख... पुणेकरांना येणाऱ्या अडीअडचणी आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात रुपालीताईंनी अनेकदा आंदोलने केली आणि संबंधितांना धडा शिकविला. मात्र, कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात रुपालीताईंचे हळवे आणि संवेदनशील मन पहायला मिळाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तरुण, आक्रमक, धडाकेबाज आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारणाऱ्या नेत्या ही रुपालीताई पाटील यांची ओळख... पुणेकरांना येणाऱ्या अडीअडचणी आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात रुपालीताईंनी अनेकदा आंदोलने केली आणि संबंधितांना धडा शिकविला. मात्र, कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात रुपालीताईंचे हळवे आणि संवेदनशील मन पहायला मिळाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउनची घोषणा झाली. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू झालेला लॉकडाउन मे महिन्यापर्यंत सुरू होता. महाराष्ट्रात आणि आपल्या पुण्यात अजूनही कमी अधिक प्रमाणात लॉकडाउन सुरूच आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक फटका बसला तो हातावर पोट असलेल्या नागरिकांना. रोज कष्ट करून रोजंदारीवर असलेल्या नागरिकांना रोज आपल्या घरची चूल कशी पेटवायची, असा प्रश्न पडला होता. रोजच्या जेवणाची भ्रांत असलेल्या नागरिकांमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांचाही समावेश होता.

Image may contain: 2 people, people sitting

जेव्हा लॉकडाउनची घोषणा झाली तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीय आणि मनसेच्या माजी नगरसेविका रुपालीताई पाटील या त्यांच्या सासरच्या गावी वाई येथे होत्या. लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे त्या वाईतच अडकल्या. बरेच प्रयत्न करूनही त्यांना परत येता येईना. एकीकडे परत येण्याचे प्रयत्न सुरू होते, तर दुसरीकडे देहविक्रय करणाऱ्या महिला आणि हातावरचे पोट असलेल्या नागरिकांना कशा पद्धतीने मदत करता येईल, यासाठीचा विचार सुरू होता.

खूप विचारांती रुपालीताईंना मार्ग सापडला. वाई येथील डी-मार्ट येथील व्यवस्थापनाशी बोलून रुपालीताईंनी मोठ्या प्रमाणावर धान्य आणि किराणा मालाची खरेदी केली.  प्रत्येक कुटुंबासाठी किती वस्तू द्यायच्या, याचे प्रमाण निश्‍चित झाले आणि त्यानुसार किट तयार होऊ लागली. वाईवरुन हे सर्व किट पुण्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांपर्यंत पोचविण्यात आली. 

...आणि चूल पेटली
लॉकडाउनमुळे देह विक्रय करणाऱ्या महिलांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले होते, मात्र ऐनवेळी रुपालीताई मदतीला धावून आल्यामुळे त्यांची रोजच्या जेवणाची चिंता मिटली, तसेच विधवा, ज्येष्ठ नागरिक, रोजंदारीवर काम करणारे मजूर, रिक्षाचालक आणि गरजू नागरिकांपर्यंत ही किराणा मालाची किट पोचविण्यात आली. ‘कठीण समय येता कोण कामास येतो...’ या उक्तीप्रमाणे लॉकडाउनच्या कठीण परिस्थितीमध्ये रुपालीताई मदतीला धावून आल्या, असे म्हणत नागरिकांनी त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मनापासून आशीर्वाद दिले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors rupalitai patil