पुणेकरांनो! लॉकडाऊनमध्ये वनोद्याने, टेकड्या, गड राहणार बंद

sinhgad
sinhgad

खडकवासला : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासन व स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लॉकडाऊन, संचारबंदी केली जाणार आहे. याकाळात शहरातील वनविभागाच्या टेकड्या वनोद्याने अशी ठिकाणे या नियमानुसार बंद राहणार आहेत. अशी माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारने शुक्रवारी संध्याकाळी ते सोमवार सकाळपर्यंत असा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करताना शहरातील शहराजवळ वन विभागाच्या असलेल्या टेकड्या, वनउद्याने, वनविभाग, झाडांचा परिसर जंगलाचा परिसर असे नागरिकांसाठी बंद राहतील. म्हणजे आज शुक्रवार संध्याकाळपासून सोमवारी सकाळ पर्यंत शहराच्या टेकड्या, गड, वनउद्याने बंद असणार आहे.  तसेच, जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळ ते सकाळपर्यंत संचारबंदी आहे. या वेळेत वन विभागात फिरता येणार नाही. सोमवारी संचारबंदी संपल्यावर दहा वाजेपर्यंत उद्याने व्यायामासाठी सुरू राहणार आहेत. जमावबंदीमुळे पण पाच व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. 

लॉकडाऊनमध्ये वन विभागाची कोणती ठिकाणे बंद राहतील 
भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी सांगितले की, "आमच्या हद्दीतील सिंहगड, तळजाई टेकडी, हिंगणे खुर्द, कोथरूड, वनदेवीच्या मंदिराच्या पाठीमागील परिसर, भांबुर्डा येथील मॅफको गार्डन, वारजेचे स्मृती वनोद्यान, वारजे जकात नाका येथील हिंगणे वारजे हद्दीवरील वन विभागाची टेकडी परिसर, एनडीए रस्त्यावरील चांदणी चौक बावधन, वारजे परिसरातील टेकडी या काळात आणि संचारबंदीच्या काळात पूर्णपणे बंद असतील. 

पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांनी सांगितले की, आमच्या हद्दीतील कोंढणपूर मार्गे सिंहगडला जाणारा रस्ता बंद असेल, लोणीकाळभोर रामदारा परिसर, मोहम्मदवाडी, मोहम्मदवाडी येथील आनंदवन, धानोरी येथील टेकडी कात्रज येथील गोकुळनगर परिसर या ठिकाणी वनविभागाच्या हद्दीत नागरिकांना लॉक डाऊनच्या काळात जाण्यास बंदी असेल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com