पुण्यात कोरोना संसर्गाचा टक्का घसरला

जुलैमध्ये प्रसारदर ५ टक्क्यांपेक्षाही कमी; मृत्युदरही एकअंकी
Corona Fight
Corona Fightsakal media

पुणे : शहरात प्रथमच जुलैमध्ये महिनाभर सरासरी कोरोना (corona) विषाणूंच्या प्रसाराचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. फेब्रुवारी महिन्यात काही दिवस अशी स्थिती होती; पण त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने नवे उच्चांक प्रस्थापित केले. आता मृत्यूचा दरही एक अंकी झाला असून, निश्चितच पुणेकरांसाठी (pune) ही एक समाधानकारक बाब आहे. सीपीसी ॲनेलिटिक्सने सादर केलेल्या विश्लेषणातून हे स्पष्ट होत आहे. (Pune corporation area corona spread slow)

विश्लेषणासाठी आजवरच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, मृत्यू यांची आठवड्याच्या गटाने विभागणी करण्यात आली. त्या आधारावर हे विश्लेषण मांडण्यात आले आहे. जुलै महिन्यात पुणे शहरात कोरोनाच्या प्रसाराच्या दराबरोबरच मृत्यूच्या संख्येतही घट झाली आहे.

विश्र्लेषक साहिल देव म्हणतात, ‘‘कोरोना साथीतील आजवरच्या प्रत्येक आठवड्यातील सरासरी आकडेवारीची तुलना आणि विश्लेषण आम्ही केले. त्याआधारावर जुलै महिन्यात बहुतेक दिवस कोरोना प्रसाराचा दर पाच टक्क्यांपेक्षाही खाली होता. तसेच मृत्यूचा दरही एक अंकी झाली आहे. निश्चितच ही एक आश्वासक बाब आहे.’’ भविष्यातील संभाव्य लाटांच्या अगदी सुरवातीच्या लक्षणांकडे उघडे डोळे ठेवून पाहायला हवे.

महत्त्वाचे निष्कर्ष...

  • कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर प्रथमच प्रसाराचा दर सर्वांत कमी

  • प्रतिदिन सर्वाधिक कोरोना मृत्यू दुसऱ्या लाटेत

  • दुसऱ्या लाटेत ज्या वेगाने मृत्युदर आणि रुग्णसंख्या वाढली, त्याच वेगाने ती कमी झाली

  • अत्‍यवस्थ रुग्णसंख्याही सरासरी

  • २०० ते ३००च्या दरम्यान पोहचली

  • पहिल्या लाटेतील रुगणसंख्या

  • दीर्घकाळ वाढतच राहिली

  • तुलनेने दुसऱ्या लाटेत अधिक गती

  • आणि कमी कालावधीत वाढली

  • जुलैत रोजची मृत्युसंख्या सरासरी

  • दहापेक्षा कमी

Sakal

'पुण्याप्रमाणेच विदर्भातही कोरोना विषाणू प्रसाराचा दर कमी झाला आहे. याचा अर्थ अशी स्थिती कायम राहील असे नाही. फेब्रुवारीमध्येही आपण हाच अनुभव घेतला होता. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनेही आपण योग्य निर्बंधांचे पालन करणे आणि लसीकरण करणे आवश्यक आहे,' असे कोविडसंबंधी राज्याचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.

Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com