Pune Corporation : दळवी रुग्णालयात कोरोनाचे उपचार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Corporation : दळवी रुग्णालयात कोरोनाचे उपचार बंद

Pune Corporation : दळवी रुग्णालयात कोरोनाचे उपचार बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीनगर येथील महापालिकेच्या दळवी रुग्णालयातील कोरोनाचे रुग्णांवरील उपचार पूर्णपणे बंद करण्यात आहे आहेत. या रुग्णालयात पूर्वीप्रमाणे प्रसूती, कुटुंब नियोजन व जनरल ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: हस्ताक्षरावरून पटली ओळख? गडचिरोलीच्या चकमकीत 'ते' चौघे ठार?

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयापैकी दळवी रुग्णालय एक आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये या रुग्णालयाने पुणेकरांना मोठा आधार दिला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात उपचारासाठी बेड मिळत नसल्याने या रुग्णालयाची क्षमता १०० वरून १८० पर्यंत वाढविण्यात आली होती. तसेच गंभीर रुग्णांसाठी आयसीयूची देखील व्यवस्था करण्यात आली.

दळवी रुग्णालय पूर्णपणे कोरोना रुग्णांसाठी सुरू केल्याने येथील महिला प्रसूती, टीबी केंद्र, महिला व बालकल्याण विभागातर्फे करण्यात येणारे लसीकरण बंद करण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होती होती, त्यांना कमला नेहरू व इतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागत होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने महापालिकेने सीओईपी जम्बो रुग्णालय बंद केले, त्यानंतर गणेश कला क्रीडा मंच येथील कोव्हीड सेंटर बंद केले आहे. दळवी रुग्णालय, बाणेर येथील कोव्हीड सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, आता शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ८०० पेक्षा खाली आली आहेत, तर गंभीर रुग्णांची संख्या १०२ इतकी आहे. हे प्रमाण कमी होत असल्याने दळवी रुग्णालयातील कोरोना उपचार बंद करण्यात आले आहेत.

हेही वाचा: नक्षलवादाला शहरी चेहरा देण्याचा मिलिंद तेलतुंबडेचा प्रयत्न

आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, ‘‘दळवी रुग्णालयात प्रसूती व इतर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यासाठी प्रसुतीसाठी ३० खाटा आहेत, याठिकाणी पूर्वी दर महिन्याला सुमारे ७० महिलांची प्रसूती होत होती. तसेच जनरल ओपीडीमध्ये १०० जणांची तपासणी केली जाते. टीबी सेंटर, कोरोना प्रतिबंधक लसीकरण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गरोदर मातांची तपासणी आदी उपचार पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहेत. यासाठी याठिकाणी ५ डॉक्टर, २२ नर्स यासह ४० जणांचे मनुष्यबळ आहे.

म्युकर मायकोसीसचा वॉर्ड सुरू

दळवी रुग्णालयातील कोरोना उपचार बंद करण्यात आले असले तरी अद्याप म्युकरमायकोसीसच्या उपचारांसाठी वॉर्ड सुरू ठेवण्यात आला आहे. यामजल्यावरर जनरल वॉर्डमध्ये १५ बेड, आयसीयू, आॅपरेशन थिएटर अशा सुविधा आहेत, असे सहाय्यक आयुक्त डॉ संजीव वावरे यांनी सांगितले.

loading image
go to top