Pune Corporation: पुण्यातील पाणी वाटपावरून गिरीश बापट यांचा सभात्याग

तीन दिवसात पुणेकरांना समान पाणी देण्याची मागणी
girish bapat
girish bapatsakal

पुणे : पुणे शहरातील पाणी वाटपाच्या मुद्द्यांवर खासदार गिरीश बापट यांनी शनिवारी (ता.२६) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतून प्रशासनाचा निषेध करत सभात्याग केला. पुणेकरांना येत्या तीन दिवसांच्या आत समान पाणी वाटप व्हावे. अन्यथा पुणेकरांच्या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारू असा इशाराही बापट यांनी यावेळी दिला. शहरातील पाणी वाटपात गरीब-श्रीमंत असा भेदाभेद केला जात आहे. यानुसार गरिबांना कमी आणि श्रीमंतांना जास्त वेळ पाणी सोडले जात असल्याचा आरोप बापट यांनी सभात्यागानंतर पत्रकारांशी बोलताना केला.

महापालिकेवर प्रशासक आल्याने आता पालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे आता आपलेच राज्य, या मानसिकतेतून प्रशासन मनमानी कारभार करू लागले आहे. त्यामुळे शहराचा जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासनाचा निषेध करत असल्याचे बापट यांनी सांगितले. शनिवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.

या बैठकीत बापट यांनी शहरातील असमान पाणी वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. पण त्यांना यावर समाधानकारक उत्तर न मिळाले नाही. गेल्या चाळीस वर्षांपासून कालवा समितीच्या सभेला उपस्थित राहत आहे. परंतु आतापर्यंत एकदाही सभात्याग करावा लागला नाही. परंतु शनिवारच्या सभेत अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने सभात्याग केल्याचे बापट यांनी सांगितले.

पुण्यातील भाजपचे सर्व माजी नगरसेवक शहरातील विविध भागांत मिळत असलेल्या पाण्याची तपासणी करणार आहेत. हे सर्व माजी नगरसेवक शहरातील येत्या दोन दिवसांत शहरातील सर्व भागांना भेट देणार आहेत.

आयुक्तांच्या बंगल्याचा पाणीपुरवठा तपासणार

दरम्यान, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या बंगल्याला रोज दुपारी ते रात्री आठ वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. या बंगल्याला उद्या (ता.२७) दुपारी चार वाजता भेट देऊन, तेथील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या पाण्याचा दाब तपासणार आहे. यातून आयुक्तांना किती पाणी मिळते, हे सर्वांसमोर मांडणार असल्याचेही खासदार गिरीश बापट यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com