पुण्यातील दांपत्याची युरोपात ‘नृत्यभरारी’

भाविन शुक्ल आणि सूनृता कोठडिया यांची यशोगाथा
 Bhavin Shukla and Sunruta Kothadia
Bhavin Shukla and Sunruta Kothadiasakal

पुणे : सालसा, बचाटा, झुंबा यांसारखे पाश्चात्य नृत्यप्रकार आपल्याकडे अलीकडच्या काळात रुळले आहेत. मात्र पंधरा वर्षांपूर्वी हे नृत्यप्रकार नवीन असताना एक तरुण व तरुणी त्याकडे आकर्षित झाले. शक्य त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत त्यांनी यात प्रावीण्य मिळवले आणि आता पाश्चात्य देशांमध्ये जाऊन या नृत्यांचा प्रसार व प्रचार आणि तेथील लोकांना या नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. या दांपत्याचे नाव आहे, भाविन शुक्ल आणि सूनृता कोठडिया.

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हे दोघे सालसा, बचाटा आदी नृत्यप्रकारांकडे आकर्षित झाले. नियमितपणे प्रशिक्षण घेतल्यानंतर हळूहळू त्यांचा या क्षेत्रात जम बसला. स्वतः प्रशिक्षक म्हणून काम सुरू केल्यावर त्यांनी काही मित्रांसह हे नृत्य शिकवण्यासाठी कंपनीही सुरू केली. २०१६ मध्ये त्यांनी लग्न केले. पुढे या दोघांची नृत्यातील साधना आणि सफाई बघून ‘लॅटिन डान्स फेस्टिवल’मध्ये सहभागी होण्यासाठी तसेच, कार्यशाळा घेण्यासाठी युरोपातील विविध देशातून त्यांना निमंत्रणे येऊ लागली. त्याचे प्रमाण वाढल्यावर काही वर्षांपूर्वी त्यांनी युरोपातच जर्मनीतील कलोन या शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

या दांपत्यातील सूनृता हिचे शिक्षण ‘अक्षरनंदन’या मराठी माध्यमातील शाळेत झाले आहे, तर भाविन पुण्याच्याच विखे पाटील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला आहे. भाविनने त्यानंतर केमिकल इंजिनियरिंगमध्ये शिक्षण घेतले. तर, सूनृताने समाजशास्त्रातून पदवी घेतली असून, पाच वर्षे ती प्रिया जोशी यांच्याकडे भरतनाट्यमही शिकली आहे. मनापासून आवडणाऱ्या या आगळ्यावेगळ्या पाश्चात्य नृत्याच्या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरूवातीला दोघांच्याही कुटुंबामध्ये या निर्णयाबाबत साशंकता होती. मात्र, दोघांचा ठाम निर्णय पाहून पालकांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिली, असे भाविन आणि सूनृता आवर्जून सांगतात. यापुढील काळात युरोपातील अन्य देशांना भेटी देण्याचे आणि कलोन शहरामध्ये यावर्षी ‘इंटरनॅशनल लॅटिन डान्स फेस्टिवल’घेण्याचा त्यांचा विचार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com