Pune Crime: नात्याला काळीमा! आजोबांकडून ११ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Pune Crime: नात्याला काळीमा! आजोबांकडून ११ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील घटना

Pune Crime: पुण्यातील कोंढवा परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता ४ थी मध्ये शिकत असून कोंढवा भागात एका शाळेतील शिक्षण घेते.

हेही वाचा: Pune ACB: पुणे 'तोडपाणी' करण्यात एक नंबर, लाचखोरीत अव्वल! कोणतं 'खातं' आघाडीवर

दरम्यान शाळेतील शिक्षक चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच या विषयाची माहिती देत होते. यावेळी पिडित मुलीने डिसेंबर महिन्यात तिच्या बरोबर घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला.

"जब घर मे कोई नही होता था तब मुझे दादाजी गोद मे बिठाते थे" असे सांगत या चिमुरडीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती शिक्षकांना दिली.

या घटने संतापाची लाट पसरली आहे. मुलीने शिक्षकांना सांगितल की, आजोबा आधी मला अश्लील व्हिडिओ दाखवायचे आणि यावरच ते थांबायचे नाही तर मी ओरडले तर ते माझे तोंड दाबून मला गप्प करायचे, असे देखील या पीडित मुलीने शिक्षकांना सांगितले.

घडलेल्या प्रकरणानंतर शिक्षकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर आरोपी विरोधात कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

टॅग्स :Pune Newspolicecrime