
Crime News : दशक्रिया विधीची संधी साधून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद!
नारायणगाव : दशक्रिया विधीसाठी कुटुंबातील सदस्य बाहेर गेल्याच्या संधीचा फायदा घेवुन घरफोडी करून सोन्याचे दागिने व पैशावर डल्ला मारणा-या सराईत गुन्हेगारास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जेरबंद केले.पोलिसांनी आरोपीकडून ५ लाख ४६ हजार ४८१ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आकाश प्रकाश विभुते ( वय ३२, राहणार फुलसुंदर अपार्टमेंट, वारूळवाडी- आनंदवाडी, ता. जुन्नर, मुळ राहणार सुपली, पो. पळशी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी आकाश विभुते याची चोरी करण्याची पध्द्त वेगळी होती. प्रथम तो दशक्रिया कोठे आहे याची माहिती घेऊन चोरी करण्याचे नियोजन करत असे.सकाळच्या वेळी कुटुंबातील सदस्य घर बंद करून दशक्रिया विधीसाठी गेले असता तो घरफोडी करून घरातील दागिने व रोख रक्कम आदींची चोरी करत असे.
आरोपीने जुन्नर तालुक्यातील गोळेगाव व निरगुडे गावचे हद्दीत याच पद्धतीने घरफोडी करून रोख रक्कम व दागिने आदींची चोरी केली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, हवालदार दिपक साबळे,
विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, राजू मोमीण, चंद्रकांत जाधव, संदिप वारे, पोकॉ अक्षय नवले, दगडु विरकर या पथकाने त्याला नारायणगाव येथून अटक केली.तपासात त्याच्याकडून ८ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा एकुन ५ लाख ४६ हजार ४८१ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर या पुर्वी सोलापुर जिल्हातील सांगोला व करंकब पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.