Crime : कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या सहायक निरीक्षकास मारहाण! पाच जणांना अटक | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news

Crime : कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या सहायक निरीक्षकास मारहाण! पाच जणांना अटक

पुणे : अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्यास गेलेल्या महापालिकेच्या सहायक निरीक्षकासह सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी प्रशांत प्रल्हाद कोळेकर (वय ३५, रा. वडगावशेरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बंडगार्डन पोलिसांनी सातजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पाच जणांना अटक केली आहे. गणेश रतनसिंग परदेशी (वय ४०), रोहित सुपरसिंग परदेशी (वय २५), रोहन सुपरसिंग परदेशी (वय २५), महेश जतनसिंग परदेशी (वय ३३), सूरज सुपरसिंग परदेशी (वय २०, सर्व रा. केनेडी रस्ता, बंडगार्डन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी प्रशांत कोळेकर हे महापालिकेत सहायक अतिक्रमण निरीक्षक आहेत. ते मंगळवारी दुपारी ए.आय.एस.एस.एम.एस. कॉलेजजवळ कैलास स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण काढण्याची कारवाई करीत होते. त्यावेळी ही कारवाई न करण्यासाठी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, सुरक्षा रक्षक आकाश लोखंडे यांनाही मारहाण करून डोक्यात लोखंडी झाऱ्याने मारून जखमी केले. याबाबत पोलिसांनी आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.