Mon, Sept 25, 2023

Pune Crime : चारित्र्याच्या संशयावरून मारहाण; पत्नीची आत्महत्या
Published on : 21 May 2023, 1:13 pm
पुणे - चारित्र्याचा संशयावरून पतीकडून सतत मारहाण होत असल्यामुळे कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसर भागात १७ मे रोजी सकाळी घडली. अनिता नागनाथ हिवराळे (वय ५९, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी मुलगी सारिका खरात (वय ३०, रा. सिद्धार्थनगर, ता. टेंभुर्णी, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती नागनाथ हिवराळे (वय ६५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी करीत आहेत.