Pune Crime : कोंढव्यातील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेकडून छापा

कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
hookah parlour raid
hookah parlour raidsakal
Summary

कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पुणे - कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (ता. १०) करण्यात आली.

एन.आय.बी.एम. कोंढवा परिसरात एका हॉटेलमध्ये अवैध हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून हॉटेलमध्ये छापा टाकला. त्यावेळी काहीजण हुक्का पार्लरमध्ये धूम्रपान करताना दिसून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करुन हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि हुक्का बनवणारे वेटर अशा एकूण चार जणांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे आणि पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ताडीवाला रोड परिसरात जुगार अड्ड्यावर छापा

सामाजिक सुरक्षा विभागाने ताडीवाला रोड परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींविरूद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com