#PuneCrime जनवाडी, वडारवाडीत सीसीटीव्हीची गरज

समाधान काटे
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

गोखलेनगर - जनवाडी, वडारवाडी, पांडवनगर, जनता वसाहत, वैदूवाडी, रामोशीवाडी या अत्यंत गजबजलेल्या व  कष्टकरी नागरिकांच्या वसाहती आहेत. सध्या येथे चोरी व छेडछाडीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे.

गोखलेनगर परिसरात दागिने, रोख रक्कम चोरीला जाण्याचे, तसेच शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. 

गोखलेनगर - जनवाडी, वडारवाडी, पांडवनगर, जनता वसाहत, वैदूवाडी, रामोशीवाडी या अत्यंत गजबजलेल्या व  कष्टकरी नागरिकांच्या वसाहती आहेत. सध्या येथे चोरी व छेडछाडीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे.

गोखलेनगर परिसरात दागिने, रोख रक्कम चोरीला जाण्याचे, तसेच शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. 

मागील महिन्यात जनवाडी परिसरात एका घरातून सोने, रोख रक्कम चोरीला जाण्याची घटना घडली. तसेच, दररोज या परिसरात रात्री मद्य पिऊन रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे,  चार चाकी गाड्या रस्त्यावरच आडव्या लावून गाणी लावणे, तलवारीने केक कापणे, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दमदाटी करणे,  शाळा, महाविद्यालयासमोर मुलींची छेड काढणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 

मुख्यत्वे मॅपको कंपाउंड, नील ज्योती बस स्टॅप, सोमेश्वर मित्र मंडळ, मंजू मित्र मंडळ, बिस्मिल्ला मैदान व इतर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  शासनाचा निधी रस्ते, वीज, उद्यान,  दिशादर्शक फलक यावर खर्च होत असताना, काही निधी नागरिकांच्या संरक्षणासाठी खर्च करायला हवा, असेदेखील स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

संपूर्ण गोखलेनगर, जनवाडी या भागात कॅमेरे बसवले पाहिजेत. मॅपको कंपनीच्या बाजूला जास्त टवाळखोर बसलेले असतात. यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल, असे येथील नागरिक प्रवीण डोंगरे यांनी सांगितले.

गुन्हेगारीच्या घटना या मुख्य रस्त्यावर न होता, त्या गल्लीबोळामध्ये होतात. याबाबत स्थानिक मंडळांनी पुढाकार घेऊन आपापल्या मंडळाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले, तर आरोपी  पुराव्यानिशी लवकर सापडतील. यामुळे पोलिसांना सहकार्य होईल. 
- अभिजित जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक 

अरुण कदम चौक, जागृती सेवा संस्था, कुसाळकर चौक, जनता वसाहतीकडे जाणारा रस्ता, वीर बाजीप्रभू शाळा, अशा महत्त्वाच्या ठिकाणी व चौकाचौकांत कॅमेरे बसवले, तर गुन्हेगारीला आळा बसेल.  
- मंगला पाटील, नागरिक, जनवाडी

चाळीमध्ये कॅमेरे बसवून त्याचे थेट कनेक्‍शन कमिशनर कार्यालयात द्यावे. जनवाडी परिसरात गाड्या जाळणे व चोरीला जाणे, तसेच रिक्षाचे, दुचाकींचे सीट फाडले जातात. या भागात जवळपास ६८ ते ७० मंडळे आहेत. या मंडळांनी इतर खर्च कमी करून कॅमेरे बसवावे.
- डॉ. अपर्णा गोसावी, नागरिक, जनवाडी 

Web Title: Pune Crime CCTV Watch on Janwadi Vadarwadi