Pune Crime News : विवाहितेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दिले चटके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime Chilli powder was thrown in eyes married woman police registered case against four persons

Pune Crime News : विवाहितेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दिले चटके

पुणे : हुंड्यासाठी विवाहितेच्या अंगावर मिरची पावडर मिश्रित पाणी टाकून जळत्या लाकडाचे चटके दिल्याचा प्रकार गंभीर उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी पतीसह चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार ऑक्टोबर २०२१ ते २० फेब्रुवारी २०२३ यादरम्यान घडला. या संदर्भात एका २२ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यावरून पती नागेश कार्तिक साहेबन्ने (वय २३), रत्ना कार्तिक साहेबन्ने (वय ४२), महादेवी जाधव (वय ५८) आणि लिंबराज भिसे (वय ५८, सर्व रा. केळेवाडी, कोथरूड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा नागेश याच्यासोबत ऑक्टोबर २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर माहेरहून हुंड्याची रक्कम आणण्यासाठी तिला सतत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत होती.

आरोपींनी विवाहितेचे हात-पाय बांधून मिरची पावडर मिश्रित पाणी तिच्या अंगावर आणि डोळ्यात टाकले. त्यानंतर तिच्या अंगावर मिठाचे पाणी टाकून पेटलेल्या लाकडाने चटके दिले. त्यात विवाहित महिलेला दुखापत झाली आहे. या संदर्भात विवाहितेने पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क साधून तक्रार दिली. यानंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी पोचून तिला ससून रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे करीत आहेत.

टॅग्स :Pune Newspunecrimewomen