शिरूर तालुक्यात ED ची कारवाई; १ लाख ७० हजारांची गावठी दारू, ताडी जप्त

अवैध धंद्यावर छापा टाकून १ लाख ७० हजार २१० रुपये किंमतीची हातभट्टी गावठी दारू, ताडी, देशी दारू व एक मोटार असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.
Crime
Crimesakal

नारायणगाव : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शिरूर तालुक्यातील आपटी, शिक्रापूर, मांजरेवाडी, रांजणगाव परिसरात अवैध धंद्यावर छापा टाकून १ लाख ७० हजार २१० रुपये किंमतीची हातभट्टी गावठी दारू, ताडी, देशी दारू व एक मोटार असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. आशी माहीती राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगावचे निरीक्षक ए. बी. पवार यांनी दिली. (ED Raid Illegal Business Pune District)

या प्रकरणी गणेश प्रकाश पाडळे( राहणार कारेगाव),देविदास कोंडे, कुमार संभाजी गव्हाणे( दोघेही राहणार रांजणगाव), बाळागौडा मूथागौडा (राहणार मांजरेवाडी), मोहनलाल देवासी (राहणार चऱ्होली) या पाच आरोपींना अटक केली आहे.

Crime
मुंबै बँक निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती?

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगावचे निरीक्षक ए. बी. पवार, दुय्यम निरीक्षक एम. एस. धोका, जी.एम.निळ, जवान , जे.जी.दाते,व्ही. डी. विंचूरकर, एम. टी. केंगले, आर.ए.पचारणे या पथकाने बुधवारी(ता.१२) छापा टाकून शिरूर तालुक्यातील आपटी, शिक्रापूर, मांजरेवाडी, रांजणगाव परिसरात अवैध धंद्यावर छापा टाकून१ लाख ७० हजार २१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दुसरी मोठी कारवाई: नारायणगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी रोजी आंबेगाव व हवेली तालुक्यात धडाकेबाज कारवाई करून बनावट देशी, विदेशी दारूचा साठा, बनावट मद्य तयार करण्यासाठी आवश्यक असलेले स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, बाटल्या सील करण्याचे यंत्र, टेम्पो असा ९ लाख १४ हजार ४३२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक केली होती. त्या नंतर बुधवारी(ता.१२) शिरूर तालुक्यात छापा टाकून मोठी कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com