किरकोळ वादातून पत्नीसह पाच जणांवर वार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पुणे - सासरच्या मंडळींबरोबर झालेल्या वादातून पतीने पत्नी, मुलगी, सासऱ्यासह आणखी दोन नातेवाइकांवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबरोबरच पतीने स्वतःवरही चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना हडपसर येथील काळेबोराटेनगरमध्ये गुरुवारी घडली. 

मिलिंद शहाजी कसबे (वय 35, रा. फुरसुंगी) असे पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबे याचे गाव उस्मानाबादमध्ये आहे. तो पत्नी व मुलीसमवेत फुरसुंगी येथे राहातो. त्याची पत्नी दोन दिवसांपूर्वी काळेबोराटे येथे माहेरी गेली होती. कसबेचे आई-वडील उस्मानाबाद येथून फुरसुंगी येथील घरी आले होते. त्यांनी कसबे व त्याच्या पत्नीस गावी येण्यास सांगितले होते. त्यामुळे कसबे हा पत्नीला घेण्यासाठी गुरुवारी तिच्या माहेरी गेला. मुलीला दोन दिवसांनी घेऊन जा, असे सासऱ्यांनी सांगितले. याचा राग आल्याने कसबे गुरुवारी सायंकाळी धारदार चाकू घेऊन सासऱ्यांच्या घरी आला आणि पत्नीसह चार वर्षांची मुलगी, सासरा, चुलत सासरा आणि चुलत मेव्हणा यांच्यावर चाकूने वार केला. स्थानिक रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी अवस्थेतील सहाही जणांना रुग्णालयात हलविले. कसबेची प्रकृती गंभीर आहे. 

Web Title: pune crime Five men injured with their wife