Pune Crime : मालकाला धमकावून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

कात्रज महामार्गावरील आर्यन स्कूलजवळ पाच-सहा जणांनी सहा मे रोजी कंपनीच्या मालकाची मोटार अडवून शिवीगाळ आणि मारहाण केली
pune crime Four arrested demanding ransom of 50 lakhs threatening company owner
pune crime Four arrested demanding ransom of 50 lakhs threatening company owneresakal

पुणे : कंपनीतील तीन कामगारांनी साथीदारांच्या मदतीने मालकाला धमकावून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे.

सौरभ संजय बनसोडे (वय २१, रा. रामनगर, वारजे), पवन मधुकर कांबळे (वय २२, रा. धायरी), संकेत योगेश जाधव (वय २४, रा. नऱ्हे) आणि कृष्णा भीमराव भाबट (वय १९, रा. धायरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

pune crime Four arrested demanding ransom of 50 lakhs threatening company owner
Crime : पश्चाताप झाला अन् अडकला! मित्राला त्याच्या पत्नीच्या खूनात केली मदत; आता झाली सक्तमजुरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज महामार्गावरील आर्यन स्कूलजवळ पाच-सहा जणांनी सहा मे रोजी कंपनीच्या मालकाची मोटार अडवून शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच, १२ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना मोबाईलवर व्हॉटसअप कॉल करुन ५० लाख रुपयांची खंडणी मागितली.

pune crime Four arrested demanding ransom of 50 lakhs threatening company owner
Jalgaon Crime News : टाकरखेडा, बांभोरीत 7 वाळू ट्रॅक्टर पकडले

खंडणी न दिल्यास फिर्यादी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com