Pune Crime : आयटीपार्क बरोबर पुण्यात वाढत गेली गुन्हेगारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune Crime: आयटीपार्क बरोबर पुण्यात वाढत गेली गुन्हेगारी!

Pune Crime Increase With IT Park : वेगात विकसित होणाऱ्या महत्वाच्या शहरांपैकी पुणे हे शहर आहे. एकेकाळी सुसंस्कृत, सुरक्षित आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून पालक मुलींना मुंबई, नागपूरला पाठवण्याऐवजी पुण्याला पाठवणं योग्य समजत असे. पण आता असं चित्र उरलेलं नाही. दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही.

कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. असं का, का हे चित्र बदललं आणि याचं मूळ कुठे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ते पुण्याचं आयटी हब होण्याच्या प्रक्रियेत आहे असं समोर आलं.

हेही वाचा: Gang War In Pune : महिनाभरातील 'या' गुन्हेगारी घटनांनी वाढवलं पुणेकरांचे टेन्शन

मुळशी पॅटर्न हा सिनेमा सगळ्यांनीच बघितला आहे. पुण्याच्या गुन्हेगारीचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्याचा संदर्भ या चित्रपटाला आहे, पण ही कथा केवळ मुळशीपुरती किंवा पुण्यापुरती मर्यादित नाही.

हेही वाचा: Pune Koyta Gang: कोयता गँग गुंडाची पोलिसांनी अटक करत काढली धिंड

एकेकाळी शांत असलेल्या पुण्यात अनेक टोळ्या कार्यरत झाल्या आणि शहराचं स्वरूप बदललं. रिअल इस्टेटच्या पार्श्वभूमीवर असलेल्या गुन्हेगारीचं चित्रण आपल्याला 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात पाहायला मिळालं, पण पुण्यात या टोळ्या कुठून आल्या या प्रश्नाची देखील चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा: Pune Koyta Gang: भर बाजारात दहशत माजवण्याचा प्रयत्न, कोयता हातात घेऊन फिरत होता

2000 पूर्वी लोकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी अत्यंत वेगळी भावना होती. जमिनीतून पीक येतं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चालतो अशीच त्यांची समजूत होती. पण 2000 नंतर लोकांच्या लक्षात येऊ लागलं की जमिनीतून अमाप पैसा कमवता येतो. त्यातून लँड माफिया वाढत गेले.

पुण्याला आयटी हब करण्याच्या महत्वाकांक्षेने आजूबाजूच्या बऱ्याच जमीनी घेतल्या. जमीनींना चांगला भाव मिळतो म्हणून काही शेतकरी स्वखुशीने तर काहींकडून जबरदस्ती जमीनी बळकावणं सुरू झालं. जमीन मोकळी करून देणारे आणि व्यवहार पूर्ण करून देणाऱ्या एजंटची संख्या वाढू लागली. कार्पोरेट कंपन्यांना एकगठ्ठा जमीन मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली. मग साम, दाम, दंड, भेद सगळ्याचा वापर करून या जमीनी मिळवण्यात येऊ लागल्या. यातूनच गुंडगिरी वाढू लागली.

याकडे सर्वसामान्य तरुण कसा झाला आकर्षित?

तरुणांना भुरळ पडावी असं या एजंट लोकांचं वर्तन असतं. महागड्या SUV आणि अंगात सोनं-नाणं याचं तरुणांना आकर्षण असतं. अंगावर जितकं सोनं आणि जितकी गाडी मोठी तितका मोठा एजंट असं अलिखित समीकरण असतं. त्यांच्याकडे ते सर्व असतं त्यामुळे तरुण त्यांच्याकडे आकर्षित होतात. बेरोजगार तरुणांना दिवसाला चारपाचशे रुपये देऊन किंवा मोठी डील झाली तर पार्टी देऊन खूश ठेवलं जातं. काही एजंट लोकांचं ऑफिस हे कार्पोरेट ऑफिसप्रमाणे चकाचक असतं. त्यामुळे तरुण आकर्षित होतो.

जशी शहरं विस्तारतील तसं गुन्हेगारीचं स्वरूप बदलतं आणि संघटित गुन्हेगारी येतेच. ही फक्त पुण्याचीच गोष्ट नाही तर जी शहरं विस्तारत आहेत तिथं आपल्याला संघटित गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतं.