उच्चभ्रू भागातील महिलांशी अश्लील संभाषण, दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

दिल्लीतील दोघेजण उच्चभ्रू भागातील महिलांशी मोबाईलवर अश्लील संभाषण करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pune Crime : उच्चभ्रू भागातील महिलांशी अश्लील संभाषण, दोघांना अटक

पुणे - दिल्लीतील दोघेजण उच्चभ्रू भागातील महिलांशी मोबाईलवर अश्लील संभाषण करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दिल्लीतील एका महिलेसह दोघांना अटक केली.

चेतन मासी दासी (वय ३२, रा. वीरेंद्रनगर, दिल्ली) आणि कविता अनिल शर्मा (वय २२, रा. उत्तमनगर, दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. चेतन दासी हा शहरातील उच्चभ्रू भागातील महिलांचे मोबाईल क्रमांक मिळवत असे.

त्यानंतर दोघे आरोपी मोबाईलवर महिलांशी अश्लील संवाद करीत असत. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणात आरोपी चेतन आणि त्याची साथीदार कविता हे दिल्लीत वास्तव्यास असल्याचे समजले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. तेथील सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपींना गाझियाबाद परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून नऊ मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीषा जाधव, रुपेश वाघमारे आणि आदेश चलवादी यांनी ही कारवाई केली.