पुण्यात पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकांमध्ये वाद विकोपाला; एकाकडून दुसऱ्यावर ब्लेडने वार

पुण्यात पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकांमध्ये वाद विकोपाला; एकाकडून दुसऱ्यावर ब्लेडने वार

पुणे : पूर्ववैमनस्य आणि प्रवासी न मिळाल्याच्या रागातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर ब्लेडने वार करून खूनाचा प्रयत्न केला. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता येरवडा येथील गुंजन चित्रपटगृह चौकात घडली. तौफीक जहांगिर बांगी (वय 30, रा. सिद्धार्थ नगर, येरवडा) याला अटक केली आहे. याप्रकरणी संभाजी रघुनाथ मदने (वय 30, रा. भेकराईनगर, हडपसर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बांगी यांच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकांमध्ये वाद विकोपाला; एकाकडून दुसऱ्यावर ब्लेडने वार
फुकटात टायरट्यूब बदलून दिले नाहीत म्हणून कोयत्याने वार; आरोपींना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी दोघेही रिक्षाचालक आहेत. काही दिवसापुर्वी त्यांच्यात भांडणे झाली होती. दरम्यान फिर्यादी हे गुरुवारी सायंकाळी येरवडा येथील गुंजन चित्रपटगृह चौकात थांबले होते. त्यावेळी बांगीने पुर्वीचे भांडण आणि प्रवासी न मिळाल्याच्या कारणातून मदने यांना शिवीगाळ करुन धक्काबुकी करीत तोंडावर बुक्की मारली. त्यानंतर "आज तुला संपवून टाकतो" अशी जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील ब्लेडने मदने यांच्या गळ्यावर वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी केले. बांगी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. या प्रकारणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बलभिम ननावरे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com