
Pune : लांडेवाडी येथे विनापरवाना अंमली पदार्थ ; अफूच्या झाडांची लागवड
घोडेगाव : लांडेवाडी पिंगळवाडी (ता. आंबेगाव) येथे विनापरवाना अंमली पदार्थ अफूच्या झाडांची लागवड केल्याप्रकरणी बन्सीलाल गेनभाऊ हुले (वय 73 वर्ष) यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
याबाबत घोडेगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी, लांडेवाडी पिंगळवाडी गावच्या हद्दीत बन्सीलाल हुले यांनी अफूच्या झाडांची लागवड केली होती. गोपनीय माहितीच्या आधारे सहायक पोलीस जीवन माने यांनी पथकासह येथे छापा टाकला. यात 2 किलो 400 ग्रॅम वजनाचा माल शेतात मिळून आला.
याची बाजारभावात अंदाजे किंमत 12 हजार 200 रूपये आहे. काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लांडेवाडी पिंगळवाडी गावच्या हद्दीत कोंडीभाऊ मारूती हुले यांच्या गट नं 347 वरील शेतात ही झाडे आढळली. आरोपी बन्सीलाल हुले यांनी ही जमीन मक्त्याने करत आहे. याबाबत ची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अनिल महादेव चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दिली.p
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी, सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, किरण भालेकर, अनिल चव्हाण यांनी पार पाडली.