पुणे : नवी पेठेत तरुणावर धारदार शस्त्राने वार करू खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

पुणे : नवी पेठेत तरुणावर धारदार शस्त्राने वार करू खून

पुणे : नवी पेठेतील जोशी वाडा येथे एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला. हि घटना नवी पेठेतील गांजवेवाडी येथे घडली. हा खून करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. आनंद उर्फ बारक्या गणपत जोरी (वय ३२, रा.पर्वती दर्शन कॉलनी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर सँडी नायर व बंडू थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैशाली गणपत जोरी (वय ३०) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठेतील पूना हॉस्पिटल जवळ असलेल्या गांजवेवाडी येथील सागर हॉटेलच्या मागील बाजूस आनंद जोरी व संशयित आरोपी बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आखाडाचे जेवण करण्यासाठी एकत्र आले होते.

त्यावेळी त्यांच्यात वाद झाले, त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने आनंद याच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने जोरी याचा मृत्यू झाला. हि घटना गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती विश्राम बागवाडा पोलिसांना मिळाली.

त्यानंतर परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त रमाकांत माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविला. दरम्यान, आरोपींनी आनंद याचा खून का केला, दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. विश्रामबाग पोलिसांकडून आरोपींची चौकशी केली जात आहे.

Web Title: Pune Crime News Navi Peth Youth Murder Vishram Bagh Wada Police Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top